
सद्गुरु (कै.) निर्मला दातेआजी देहत्याग करण्यापूर्वी त्या रहात असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील खोलीत साधक सद्गुरु दातेआजींच्या देहत्यागानंतर रहायला गेल्यानंतर त्याचा नामजप सतत आणि गुणात्मक होणे
‘२९.१.२०२६ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु दातेआजी यांच्या कृपेने मी अन् माझी आई पू. (श्रीमती) कुसुम जलतारे (सनातनच्या ९५ व्या संत, वय ८६ वर्षे) सद्गुरु (कै.) दातेआजी यांचे त्यांच्या देहत्यागापूर्वी वास्तव्य असलेल्या खोलीत रहायला गेलो. सद्गुरु दातेआजींसाठी नामजपादी उपाय सांगण्याच्या निमित्ताने गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) काही महिने त्या खोलीत येत असत. त्यामुळे ती खोली पुष्कळ चैतन्यमय झालेली आहे. जवळजवळ सर्वच साधकांना त्या खोलीत गेल्यावर विविध अनुभूती येतात.

२९.१.२०२६ या दिवशी आम्ही त्या खोलीत रहायला गेल्यानंतर रात्री मी पुष्कळ दमलो होतो. मी सेवा लवकर आटोपून खोलीत झोपण्यासाठी गेलो. खोलीत गेल्यावर माझा नामजप पुष्कळ गतीने आणि सतत होऊ लागला. ‘जणू काही कुणी तरी माझ्याकडून नामजप करून घेत आहे’, असे मला जाणवत होते. त्या रात्री उशिरापर्यंत माझा नामजप चालूच होता. सध्या मला थकवा असल्याने सकाळी लवकर जाग येत नव्हती. आम्ही या खोलीत रहायला आल्यावर पहिल्या दिवशी मी पहाटे ४ वाजल्यापासून जागाच होतो. तेव्हाही माझ्या मनात काही विचार नसून माझा नामजपच होत होता. त्या खोलीत रहायला गेल्यापासून माझ्या नामजपाची गुणवत्ता वाढल्याचे लक्षात आले.’
– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, सनातन प्रभात प्रसारमाध्यम (१५.२.२०२६)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या विचारसरणीतील मूलभूत भेद !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
हिंदु राष्ट्रात भक्तीभाव असलेल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !