‘नांदेड येथील साधकांना पू. (श्रीमती) अनिता बरारा यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. सौ. श्वेता देशपांडे
१ अ. ‘श्रीमती बराराभाभी (श्रीमती अनिता बरारा) सतत शिकण्याच्या स्थितीत असतात.
१ आ. प्रेमभाव : त्या त्यांच्या घरी येणार्या गृहकृत्य साहाय्यकांशीही (घरात कामाला येणार्या व्यक्तींशी) प्रेमानेच बोलतात. त्या ‘अतिथी देवो भव ।’, हे वचन तंतोतंत पाळतात. त्या सर्वांशीच समभावाने वागतात.
१ इ. भाभी स्वभावाने अत्यंत स्थिर आणि शांत आहेत.
१ ई. त्यांना कितीही अडचण असली, तरीही त्या व्यष्टी साधनेत कधीच खंड पडू देत नाहीत.
१ उ. गुरुकार्याची तळमळ : त्यांचे कुटुंब प्रतिष्ठित आणि सधन आहे. त्या ७२ वर्षांच्या आहेत, तरीही त्या कोणतीही सेवा करायला तत्पर असतात. त्या संस्थेच्या सर्वच कार्यक्रमांत स्वच्छतेसह सर्व सेवा करतात. त्या स्वतःहून नेहमी सेवेविषयी विचारत असतात. त्यांच्यामध्ये सेवेप्रती पुष्कळ भाव आणि उत्साह आहे.
१ ऊ. त्यांच्या समवेत सेवा करतांना मला सहजतेने अंतर्मुखता साधता येते.’
२. सौ. तृप्ती येरगेवार
२ अ. व्यवस्थितपणा : ‘श्रीमती बराराभाभी सेवा करतांना सर्व साहित्य ठरलेल्या ठिकाणी आणि व्यवस्थित ठेवतात.
२ आ. साधनेचे गांभीर्य : त्या सतत गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करत असतात. यातून ‘गुरुदेवांनी सांगितलेली व्यष्टी साधनेच्या संदर्भातील सूत्रे आचरणात आणून त्या गुरुदेवांचे आज्ञापालन करत आहेत’, असे लक्षात येते.
२ इ. ‘त्या सतत शरणागतभावात आहेत’, असे जाणवते.
२ ई. श्रीमती अनिता बरारा यांच्या संदर्भातील अनुभूती
१. मी भाभींच्या समवेत सेवा करत असतांना ‘त्यांच्यातील चैतन्यामुळे मला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो’, असे मला जाणवते.
२. माझ्या मनाची स्थिती चांगली नसतांना मी भाभींशी बोलल्यावर मला हलकेपणा जाणवतो.
३. त्या माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेत असतांना माझी गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त होते की, ‘संतपदाकडे मार्गक्रमण करणार्या भाभी माझा आढावा घेत आहेत.’
३. श्री. विनोद कोंडावार
३ अ. ‘बराराभाभींना कोणतीही अडचण आल्यास त्या स्वतः स्थिर राहून इतरांना साहाय्य करतात.
३ आ. माझ्या आई-वडिलांनीही माझ्यावर केले नसेल, तितके प्रेम मी पू. (श्रीमती) अनिता बरारा यांच्याकडून अनुभवतो.
३ इ. त्या व्यवहारातील गोष्टींत वेळ न घालवता साधना करतात.
३ ई. गुरुकार्याची तळमळ : त्या लग्नकार्यानिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणानिमित्त बाहेर गेल्यासही अध्यात्मप्रसार करतात. तेव्हा त्या पाहुण्यांना साधना सांगणे आणि त्यांच्याकडून अर्पण घेणे, अशा सेवा करतात. त्या प्रत्येक सेवा मनापासून स्वीकारतात आणि ती सेवा तळमळीने करतात. त्या नेहमी सेवेचे ध्येय ठरवून आणि सकारात्मक राहून सेवा पूर्ण करतात. ‘गुरुदेवच सेवा करून घेतात’, असा त्यांचा भाव असतो. सेवेला बाहेर जाण्यासाठी त्याच मला संपर्क करतात.
३ उ. कर्तेपणा गुरुदेवांना अर्पण करणे : भाभी या वयातही साधकांसह सनातन पंचांग आणि सनातन वह्या यांचे वितरण करतात. त्या तरुणांना लाजवेल, अशी सेवा करतात. त्या स्वतःकडे सेवेचा कर्तेपणा घेत नाहीत.’
पू. (श्रीमती) अनिता बरारा यांची सद्गुरु नंदकुमार जाधव यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

१. श्रीमती बरारा यांचे यजमान प्रतिष्ठित व्यावसायिक असणे आणि त्यांनी पत्नीला बाहेर जाऊन सेवा करायला विरोध करणे अन् त्याही परिस्थितीत श्रीमती बरारा यांनी तळमळीने सेवा करणे
‘श्रीमती अनिता बरारा सधन कुटुंबातील आहेत. त्यांचे यजमान (आताचे कै. सुरेंद्रपाल बरारा, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) एक प्रतिष्ठित व्यावसायिक होते. नांदेड येथील व्यापारी, अधिवक्ता, आधुनिक वैद्य, अधिकारी, राजकारणी अशा सर्वांशीच कै. बरारा यांचा चांगला परिचय होता. ‘श्रीमती बरारा यांनी समाजातील व्यक्तींकडून विज्ञापने मिळवणे आणि अर्पण आणणे’, हे त्यांच्या यजमानांना आवडत नसे. श्रीमती बरारा यांनी बाहेर जाऊन अध्यात्मप्रसाराची सेवा करायला त्यांच्या यजमानांचा विरोध होता. यजमान कामानिमित्त बाहेर गेल्यावर श्रीमती बरारा सेवेला जात असत आणि सत्संगांना उपस्थित रहात असत. यजमान घरी येण्यापूर्वी त्या घरी येत असत.
श्रीमती बरारा ७३ वर्षांच्या आहेत. या वयातही त्या नियमित अध्यात्मप्रसाराच्या सेवेसाठी बाहेर जातात.
२. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून स्वभावदोषांवर मात करणे
श्रीमती बरारा यांच्यामध्ये तीव्र स्वभावदोष नव्हते. त्यांच्यात गुणच अधिक होते. त्यांच्यात ‘अपेक्षा करणे आणि आग्रहीपणा’ हे स्वभावदोष काही प्रमाणात होते. त्यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून स्वभावदोषांवर मात केली. त्यांनी स्वतःमध्ये ‘प्रेमभाव आणि नम्रता’ हे गुण वृद्धींगत केले. त्यांच्यामध्ये झालेले पालट साधकांच्याही लक्षात आले आहेत. वर्ष २०१३ मध्ये श्रीमती बरारा यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली.
३. ‘श्रीमती बरारा यांनी स्वतःत केलेले पालट आणि त्यांची झालेली आध्यात्मिक प्रगती’ यांमुळे त्यांच्या यजमानांचा विरोध अल्प होऊन त्यांनी पत्नीला सेवेत साहाय्य करणे अन् श्रीमती बरारा यांच्या यजमानांचीही आध्यात्मिक प्रगती होणे
‘श्रीमती बरारा यांच्या स्वभावात झालेले पालट आणि त्यांची झालेली आध्यात्मिक प्रगती’ यांमुळे त्यांच्या यजमानांचा त्यांच्या साधनेला असलेला विरोध न्यून होत गेला. श्रीमती बरारा यांच्यामुळे त्यांचे कुटुंबीयही साधना करू लागले आहेत. ‘सनातन संस्था सांगत असलेली साधना आणि संस्थेचे कार्य योग्य आहे’, हे कै. बरारा यांच्या लक्षात आले. नंतर ते स्वतः फलक प्रदर्शन लावण्याच्या सेवेत सहभागी होऊ लागले. ते त्यांच्या प्रतिष्ठित मित्रांना प्रदर्शन पहायला आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभा ऐकायला घेऊन येऊ लागले. ‘श्रीमती बरारा यांना सेवेच्या ठिकाणी पोचवणे आणि त्यांना घरी घेऊन येणे’, यांसाठी त्यांनी त्यांच्या चारचाकी गाडीच्या चालकाला सांगून ठेवले होते. कै. बरारा पत्नीला साधनेसाठी साहाय्य करू लागले आणि त्यांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.
४. श्रीमती बरारा यांची सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या प्रती दृढ श्रद्धा आहे. त्या गुरुदेवांचे स्मरण करतात. त्या कर्तेपणा गुरुदेवांना अर्पण करतात. ‘सर्वकाही गुरुदेवच करतात’, असे त्या सतत म्हणतात.’
(‘हे लिखाण श्रीमती अनिता बरारा संतपदी विराजमान होण्याच्या आधीचे असल्याने श्रीमती अनिता बरारा यांच्या नावाच्या आधी ‘पू.’ असे लिहिले नाही.’ – संकलक)
– (सद्गुरु) नंदकुमार जाधव, जळगाव (२१.११.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान