शनिदेव पूजेच्या वेळी मंदिरात स्फोट
ढाका – बांगलादेशात ६ आणि ७ मार्च या दिवशी बोगुरा आणि कॉक्स बाजार येथील घटनांमध्ये २ हिंदूंची हत्या करण्यात आली, अशी माहिती ‘बांगलादेश जातीय हिंदु महासंघ’ या संघटनेने दिली आहे. ‘बांगलादेश जातीय हिंदु महासंघा’चे महासचिव मृत्युंजय कुमार रॉय यांनी सांगितले की, ६ मार्च या दिवशी बोगुरा जिल्ह्यातील सारियाकांदी येथे भूमीवरून उद्भवलेल्या वादातून चायोन राजभर (वय ४० वर्षे) नावाच्या हिंदूंची काही धर्मांध गुंडांनी भोसकून हत्या केली. मृत चायोन राजभर हे ‘द न्यू कॉन्टेस्ट’ या स्थानिक प्रशिक्षण केंद्राचे संचालक होते. तसेच ७ मार्च या दिवशी कॉक्स बाजार शहरात गणेश पाल (वय २९ वर्षे) नावाच्या एका हिंदु तरुणाची खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे जिहाद्यांनी भोसकून हत्या केली. अन्य एका घटनेत येथील श्री शनिदेव मंदिरात पूजेच्या वेळी स्फोट करण्यात आला. (बांगलादेशात नुकतेच तारिक रेहमान यांच्या नेतृत्वाखाली ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पाटी’चे सरकार स्थापन झाले आहे; तरीही हिंदूंच्या हत्या चालूच आहेत. यावरून बांगलादेशात होणार्या हिंदूंच्या हत्या राजकीय स्वरूपाच्या असल्याचे सांगून त्याविषयीचे दायित्व नाकारणार्या राज्यकर्त्यांचे पितळ उघडे पडले आहे ! हा हिंदूंच्या वंशविच्छेदाचाच प्रकार आहे, हे यातून स्पष्ट होत आहे ! – संपादक)
यापूर्वी चट्टोग्राम शहरातील अलंकार परिसरात कामगारांकडून खंडणी वसुलीला विरोध केल्यामुळे आकाश दास नावाच्या एका हिंदु युवकाची हत्या करण्यात आली होती. त्याच जिल्ह्यातील चंदनाईश उपजिल्ह्यातील बदूरपारा परिसरात गुरांची चोरी रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे चंदन डे नावाच्या हिंदूची धर्मांध मुसलमानांनी गोळ्या झाडून हत्या केली होती, अशी माहिती या संघटनेने दिली.
संपादकीय भूमिकाबांगलादेशात हिंदू असुरक्षितच ! |

अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !