|

नाशिक – येथील पवित्र गोदावरी नदीच्या पात्रात रंगपंचमी खेळतांना काही तरुणांनी चप्पल-बूट एकमेकांवर फेकले. यामुळे गोदामाईचा अवमान झाल्याचे काही हिंदूंनी सांगितले. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे नोंदवण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. नदीच्या पात्रात नंतर मोठ्या प्रमाणावर चपला-बूट यांचा खच दिसून आला. महापालिका आणि पोलीस यांनी सुमोटो (जनहित याचिका) नोंद घेऊन संबंधितांवर गुन्हे नोंदवावावेत, अन्यथा न्यायालयात जाऊ, अशी चेतावणी हिंदूंनी दिली आहे.
‘भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पुढील वर्षापासून गोदावरी नदीच्या पात्रात रंगपंचमी खेळण्यास पूर्णतः बंदी घालावी’, अशी मागणीही गोदावरीप्रेमींकडून करण्यात येत आहे.
गोदामाईच्या पावित्र्याचा अपमान करणार्यांवर तातडीने गुन्हे नोंदवा !
भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले म्हणाले, ‘‘नाशिकच्या वैभवाला कलंक लावणारा आणि अत्यंत किळसवाणा प्रकार गोदावरी नदीच्या पात्रात घडला. गोदामाईच्या पावित्र्याचा अपमान करणार्यांवर पोलिसांनी तातडीने गुन्हे नोंदवावेत.’’ (अशी मागणी करण्याची वेळ का येते ? पोलीस आणि प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?
जपमाळ