Sukhoi Jet Crash : आसाममध्ये वायूदलाचे सुखोई लढाऊ विमान कोसळले : २ वैमानिकांचा मृत्यू

गौहत्ती (आसाम) – भारताचे ‘सुखोई-३० एमकेआय’ हे लढाऊ विमान आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात कोसळले. यात २ वैमानिकांचा मृत्यू झाला. स्क्वाड्रन लेफ्टनंट अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर अशी त्यांची नावे आहेत.

भारतीय वायूदलाने म्हटले आहे की, ‘सुखोई-३० एमकेआय’ हे लढाऊ विमान प्रशिक्षण मोहिमेवर होते; मात्र अचानक या लढाऊ विमानाचा उड्डाणानंतर काही वेळात रडारशी संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान आसाममधील जोरहाटपासून सुमारे ६० कि.मी. अंतरावर असलेल्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात कोसळले. या विमानाचा संपर्क नेमके कशामुळे तुटला ? हे विमान कशामुळे कोसळले ? याचे अन्वेषण केले जाणार आहे.

जून २०२४ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात निफाडमधील शिरसगाव गावाजवळ ‘सुखोई -३० एमकेआय’ हे विमान कोसळले होते; पण वैमानिक आणि सहवैमानिक  सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते.

संपादकीय भूमिका

संपतकाळात लढाऊ विमाने कोसळणारा जगातील एकमेव देश भारत !