
पंढरपूर – शहरात काही बुलेटचालकांकडून आस्थापनाने दिलेले ‘सायलेन्सर’ (आवाज अल्प करणारे साधन) काढून त्याऐवजी मोठ्या कर्कश आवाजाचे नियमबाह्य ‘सायलेन्सर’ बसवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ध्वनीप्रदूषणात वाढ होत असून नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी त्यांच्या दुचाकींमध्ये नियमबाह्य पालट करू नयेत आणि आस्थापनाने दिलेले ‘सायलेन्सर’च वापरावेत, असे आवाहन साहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केले आहे.
शहरात बुलेट ‘सायलेन्सर’मध्ये पालट करून मोठा आवाज करणार्यांच्या विरोधात वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर ध्वनीप्रदूषण नियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !