श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या दैवी वाणीतून भक्तीसत्संगात स्रवलेले अमृतबिंदू !

१. ‘ऐकण्याची वृत्ती’ ही साधकाची सर्वांत मोठी शक्ती असणे
विविध सत्संग, बैठका, व्यष्टी आढावे, कार्य आढावे यांमध्ये सांगितली जाणारी सूत्रे ‘ऐकणे आणि त्यानुसार कृती करणे’ महत्त्वाचे ठरते; कारण ‘ऐकणे’ किंवा ‘ऐकण्याची वृत्ती’ ही साधकाची सर्वांत मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या बळावर साधकाला अध्यात्माच्या मार्गावर चालणे सोपे होते.
२. ऐकण्याच्या वृत्तीमुळे दाखवलेला मार्ग आत्मसात करता येतो !
साधनेत ‘विचारणे’ या सूत्रासह ‘ऐकण्याचे’ही तितकेच महत्त्व आहे. अडचणी किंवा शंका विचारल्यामुळे आपल्याला दिशा मिळते, तर सांगितलेले ऐकल्यामुळे दाखवलेला मार्ग किंवा दिशा आत्मसात् करता येते.
३. गुरूंनी सांगितलेले मनापासून ऐकण्याचे महत्त्व
गुरु किंवा संत यांनी सांगितलेले मनापासून ऐकले आणि ते कृतीत आणले, तर त्यांचे शब्द हे केवळ शब्द न रहाता ‘दिव्य मंत्र’ बनतात आणि आपल्या जीवनात आमूलाग्र पालट करतात.
४. ऐकल्यामुळे आपले गुरूंशी असलेले नाते अधिक दृढ होते !
ईश्वर, गुरु, संत या सर्वांशी नाते दृढ करण्यासाठी ‘ऐकणे’ हा सर्वोत्तम सेतू (पूल) आहे. जसे आपले ऐकणारा जीव आपल्याला जवळचा वाटतो, तसेच गुरूंचे ऐकणारा जीव त्यांच्या अधिक स्मरणात रहातो. त्यामुळे ऐकण्याच्या माध्यमातून आपले गुरूंशी असलेले नाते आपोआपच दृढ होते.
५. ‘ऐकणे’ म्हणजे गुरुकृपेचा मार्ग
गुरु अथवा त्यांचे समष्टी रूप असलेले संत, उत्तरदायी साधक आणि सहसाधक यांनी सांगितलेले ऐकून लगेच कृतीत आणले, तर साधकावर गुरूंची भरभरून कृपा होते.
६. गुरूंच्या एका वाक्यात संपूर्ण साधनेचा मार्ग दडलेला असणे
मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव साधकांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिके आणि ग्रंथ यांच्या माध्यमातून सातत्याने मार्गदर्शन करत असतात. श्री गुरूंनी साधकांना केलेले हे मार्गदर्शन म्हणजे यशस्वी जीवनासाठी दिशादर्शनच होय. गुरूंच्या एका वाक्यात संपूर्ण साधनेचा मार्ग दडलेला असतो. त्यांनी सांगितलेले जो ऐकतो, त्यालाच तो मार्ग गवसतो.
७. खरा शिष्य
जो गुरूंनी आणि त्यांच्या समष्टी रूपाने सांगितलेले मनापासून ऐकतो अन् त्याप्रमाणे कृती करीत जीवन जगतो, तोच खरा शिष्य होय !
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१०.१२.२०२५)
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यासाठी नवीन प्रश्न विचारण्याची कारणे आणि त्यांचे होणारे लाभ
साधनेचे अद्वितीयत्व जाणून घ्या !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !