‘फाल्गुन पौर्णिमा (३.३.२०२६, मंगळवार) या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण हे भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे. ग्रस्तोदित, म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल.

१. ग्रहण वेधारंभ
हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी, ३ मार्च २०२६ या दिवशीच्या सूर्याेदयापासून ग्रहण मोक्षापर्यंत (सायंकाळी ६.४८ वाजेपर्यंत) ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवती स्त्रिया यांनी सकाळी ११ वाजल्यापासून ग्रहण मोक्षापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत. वेधकाळात स्नान, देवपूजा, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतात. वेधकाळात भोजन करणे निषिद्ध आहे; मात्र वेधकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे, मल-मूत्रोत्सर्ग करणे, झोप घेणे ही कर्मे करता येतात. ग्रहण पर्वकाळात, म्हणजे आपल्या गावातील सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत (सायंकाळी ६.४८ वाजेपर्यंत) या काळात पाणी पिणे, मल-मूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत.

२. चंद्रग्रहणाच्या वेळा (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
२ अ. स्पर्श (आरंभ) : दुपारी ३.२० वाजता
२ आ. संमीलन (conjunction) : सायंकाळी ४.३४ वाजता
२ इ. मध्य : सायंकाळी ५.०४ वाजता
२ ई. उन्मीलन (opposition) : सायंकाळी ५.३३ वाजता
२ उ. मोक्ष (शेवट) : सायंकाळी ६.४८ वाजता
२ ऊ. ग्रहणपर्व (ग्रहणाच्या आरंभापासून समाप्तीपर्यंतचा एकूण कालावधी) : ३ घंटे २८ मिनिटे
(वरील सर्व वेळा संपूर्ण भारतासाठी आहेत.)
(साभार : दाते पंचांग)
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (२४.२.२०२६)
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !