
सोलापूर – येथील जुन्या वालचंद महाविद्यालयासमोर नुकतीच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान याची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याच्या निषेधार्थ मूक निदर्शने आणि आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
या वेळी कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचे फलक धरून शांततेत पण ठामपणे स्वत:ची भूमिका मांडली. ‘शिवचरित्राचा अवमान थांबवा’, तसेच ‘वक्तव्य तात्काळ मागे घ्या’, अशा आशयाचे संदेश फलकांद्वारे देण्यात आले.
या आंदोलनात समितीच्या कार्यकर्त्यांसह विद्यमान नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, तसेच शहर आणि ग्रामीण भागांतील ५० हून अधिक शिवप्रेमी सहभागी झाले होते.
सपकाळ यांच्या विधानाच्या निषेधार्थ निवेदनावर स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभाग नोंदवून स्वत:चा निषेध व्यक्त केला.
| ११ मार्च या दिवशी सोलापूर येथे होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने सभेचे निमंत्रणही देण्यात आले. |
नैऋत्य मौसमी पावसाचे (मान्सूनचे) केरळमध्ये आगमन
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ७ जुलै या दिवशी प्रस्थान !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !