‘२२.२.२०२४ या दिवशी महर्षींनी नाडीपट्टीत उल्लेखिल्यानुसार रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात (आश्रम परिसरातील श्री तनोटमाता देवळासमोर) घंटेची स्थापना आणि पूजन करण्यात आले. त्यानंतर साधक पुरोहितांनी ती घंटा १-२ मिनिटे वाजवली.

‘घंटा वाजवल्यावर त्यातून उत्पन्न होणार्या नादाचा देऊळ, देवळातील देवता आणि व्यक्ती यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने काही संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला. लोलकाने वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. हे संशोधन पुढे दिले आहे.


१. चाचण्यांतील नोंदींचे विवेचन
या प्रयोगात घंटानादापूर्वी (घंटा वाजवण्यापूर्वी) आणि घंटानादानंतर (घंटा वाजवल्यानंतर) देऊळ, देवळातील देवता (श्री तनोटमातेची मूर्ती, शिवस्वरूप व्यासशिळा, श्री त्रिनेत्र गणेशाची मूर्ती आणि त्रिशूळ), घंटा, साधक पुरोहित आणि आध्यात्मिक त्रास असलेल्या अन् नसलेल्या विविध आध्यात्मिक पातळीच्या ४ साधिका यांची छायाचित्रे काढण्यात आली. या सर्व छायाचित्रांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील नोंदींचे विवेचन पुढे दिले आहे.
१ अ. घंटा वाजवल्यानंतर देऊळ, देवळातील देवता आणि घंटा यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे : देऊळ, देवळातील देवता आणि घंटा यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. घंटा वाजवल्यानंतर या सर्वांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली, हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.
१ अ १. निष्कर्ष : देऊळ, देवळातील देवता आणि घंटा यांच्यामध्ये आरंभीही पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. घंटा वाजवल्यानंतर या सर्वांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अनुमाने ३०० ते ७५० मीटरने वाढली. घंटानादातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा हा सकारात्मक परिणाम आहे.
१ आ. घंटानाद ऐकल्यानंतर साधक पुरोहित आणि ४ साधिका यांच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

१ आ १. निष्कर्ष : घंटानाद ऐकल्यानंतर सर्वांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अनुमाने ४ ते ६.४ मीटरने वाढली. घंटानादातून प्रक्षेपित झालेले चैतन्य सर्वांनी त्यांच्या क्षमतेनुसार ग्रहण केले. त्यामुळे त्यांना आध्यात्मिक लाभ झाला. यातून ‘घंटानाद ऐकल्याने व्यक्तीला आध्यात्मिदृष्ट्या लाभ होतो’, हे लक्षात येते.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१३.१०.२०२५)
|

मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !