
१. पू. संदीप आळशी भावपूर्ण प्रार्थना करत असतांना पाहून ‘ते देवाशी सूक्ष्मातून बोलत आहेत’, असे जाणवणे
‘एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजपादी उपाय करत होतो. तेव्हा तिथे पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे संत, वय ५१ वर्षे) हेही नामजपादी उपाय करत होते. माझे लक्ष पू. संदीपदादांकडे गेले. त्या वेळी ते प्रार्थना करत होते. त्यांच्याकडे पाहून मला वाटले, ‘ते इतकी भावपूर्ण प्रार्थना करत आहेत की, ‘जणू ते सूक्ष्मातून देवाशी बोलत आहेत.’

२. पू. संदीप आळशी यांची प्रकृती ठीक नसूनही त्यांचे नामजपादी उपाय करण्याचे गांभीर्य पाहून ‘तळमळ असेल, तर देव क्षमता निर्माण करतो’, याची जाणीव होणे
पू. संदीपदादा प्रार्थना करून स्वतःवरील आवरण काढत होते. त्यांची आवरण काढण्याची पद्धत आदर्श आहे. ते नामजपादी उपाय करत असतांना अधून-मधून ‘शरिरावरील आवरण काढणे, सप्तचक्रांवर न्यास करणे’, असे करत असतात. तेव्हा माझ्या मनात विचार आले, ‘मी केवळ प्रार्थना करून नामजपादी उपाय करतो; पण ते भावपूर्ण करत नाही. त्यामुळे मला नामजपादी उपाय केल्याचा परिणाम दिसत नाही किंवा ते केल्यानंतर मला हलकेपणा जाणवत नाही. पू. संदीपदादांची प्रकृती ठीक नसूनही ते अधून-मधून ‘सप्तचक्रांवर न्यास करणे आणि शरिरावरील आवरण काढणे’ इत्यादी कृती करतात.’ तेव्हा ‘तळमळ असेल, तर देव क्षमता निर्माण करतो’, याची मला जाणीव झाली.
३. पू. संदीप आळशी यांच्या कृतीतून ‘नामजपादी उपाय एकाग्रतेने, परिपूर्ण आणि भावपूर्ण केल्यास शरिरावरील आवरण नष्ट होते’, हे लक्षात येणे
‘नामजपादी उपाय एकाग्रतेने, परिपूर्ण आणि भावपूर्ण केल्यास शरिरावरील आवरण नष्ट होते. नामजपादी उपाय करत असतांना ते उपाय करण्यालाच प्राधान्य देणे आवश्यक आहे’, हे मला पू. संदीपदादा यांच्या कृतीतून शिकायला मिळाले.
४. पू. संदीप आळशी शतपावली करत असतांनाही त्यांची सप्तचक्रांवर न्यास करण्याची कृती पाहून नामजपादी उपाय करण्याचे गांभीर्य लक्षात येणे
पू. संदीपदादा शतपावली (भोजन झाल्यानंतर थोडेसे मंद गतीने फिरणे) करत असतात. त्या वेळीही ते हाताने सप्तचक्रांवर न्यास करतांना दिसतात. ‘पू. दादा संत आहेत’, तरीही त्यांची गांभीर्याने आणि भावपूर्ण नामजपादी उपाय करण्याची कृती पाहून मला तसे उपाय करण्याचे गांभीर्य लक्षात आले.
‘हे गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), ‘पू. संदीपदादांप्रमाणे नामजपादी उपाय करण्याचे गांभीर्य माझ्यामध्ये आणि सर्व साधकांमध्ये निर्माण होऊ दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. विठ्ठल कदम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१.२०२६)
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
१४ जुलै : सनातनचे संत पू. उमेश शेणै यांचा वाढदिवस
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।