
१. ‘आदर्श शेती कशी असायला हवी ?’, हे समाजाला शिकवायचे आहे !
सौ. योगेश्री घोळे : नमस्कार, आम्ही प्रत्यक्ष प्रसाराची सेवा करत नाही. आपल्या कृपेनेच आमचे सर्व चालले आहे. शरीर आमचे आहे; मात्र त्यावर नियंत्रण आपलेच आहे.
आम्ही दोघांनीही पंचगव्यासंबंधी शिक्षण घेतले होते. मी जेथे पंचगव्याचे शिक्षण घेतले, तेथील डॉ. निरंजन वर्मा हेही सनातन संस्थेशी जोडलेले आहेत. त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे. तेथे त्यांनी आम्हाला पंचगव्याची औषधेही सिद्ध करायला शिकवले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुमची शेती आहे का ? कुठे आहे ?
श्री. महेश घोळे : पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर हिंगणगाव नावाचे गाव आहे. तेथे आमची शेती आहे.
सौ. योगेश्री घोळे : तेथील जीवन माझ्यासाठी पूर्णतः नवीन होते. ते मी स्वीकारले. प.पू. गुरुदेव, आपल्या कृपेनेच मला ती जीवनपद्धत स्वीकारता आली. तेथे मी आता पुष्कळ नवीन गोष्टी शिकत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : अरे, तुम्ही प्रत्यक्ष शेती करत आहात. आम्ही तर आता केवळ शेतीचा विचारच करत आहोत. ‘शेती कशी करायची ? शेतीत लागवड करून तेथे संशोधन कसे करायचे ?’, याविषयी आम्हाला काहीच ठाऊक नाही. तुम्ही त्याविषयी थोडा अभ्यास करून ठेवा. शेती करणारे लोक पुष्कळ आहेत; परंतु त्यांना असे कुणी शिकवत नाही. त्यांच्या वडिलांनी शेती केली, तशीच (पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार) ते शेती करत आले आहेत. आपल्याला ‘आदर्श शेती कशी असली पाहिजे ? सात्त्विक शेती कशी असली पाहिजे ?’, हे सर्व समाजाला शिकवायचे आहे. तुम्ही तसा अभ्यास करा. अभ्यासाची सूत्रे आम्हाला पाठवत चला. जेव्हा शेती आपल्या हातात मिळेल, तेव्हा सर्वांना तेथे नेऊन सर्व दाखवू.
२. ‘पशूधनाची काळजी कशी घ्यावी ?’, याविषयी लोकांना शिकवायचे आहे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आपल्याजवळ जेवढी जागा उपलब्ध आहे, त्यातील अर्ध्या भागात शेती करायची आणि अर्धा भाग गाय, बैल इत्यादी प्राण्यांसाठी राखून ठेवायचा. ‘पाळीव प्राण्यांची जोपासना कशी करायची ? त्यांना सात्त्विक कसे बनवायचे ? त्यांचे रक्षण कसे करायचे आहे ? त्यांची वंशवृद्धी कशी करायची ?’, हे सर्व लोकांना शिकवायचे आहे. नंतर तुम्हाला तेथे कार्यशाळा चालू करायच्या आहेत.
सौ. योगेश्री घोळे : गुरुदेव, जेव्हा आम्ही येथे आल्यावर शेती करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आम्ही दोघांनी नोकरीचे त्यागपत्र दिले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘ईश्वराची काय अपेक्षा आहे’ तेवढेच आपण पहायचे असते. शेती करणार्यांना कुणी शिकवत नाही ना ? त्यांवर काही संशोधन केलेले नसते. ते संशोधन आपण करणार आहोत. २ ते ४ वर्षे लागतील. नंतर काही सिद्धांत सिद्ध होतील. ते सर्व लोकांना शिकवायला चालू करू. ईश्वर कसे करतो ना ? आता आम्ही शेतीविषयी नुकताच विचार करायला आरंभ केला, तर २ ते ४ आठवड्यांतच तुम्ही येथे आलात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेली पुणे येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. राधिका घोळे (वय ८ वर्षे) !

१. रामनाथी आश्रमात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील अस्तित्व जाणवणारी कु. राधिका घोळे !
सौ. योगेश्री घोळे : ‘आम्ही सात्त्विक वस्तूंचे जतन करण्याशी संबंधित सेवा चालते, तेथे गेलो होतो. तेथून बाहेर आल्यावर राधिकाला (मुलीला) ‘आपण (प.पू. गुरुदेव) एका खोलीतून दुसर्या खोलीत गेलात’, असे वाटले. तिने मला विचारले, ‘‘आई, येथे परम पूज्य रहातात ना ?’’ तेव्हा मी म्हटले,‘‘ नाही. ते येथे रहात नाहीत.’’ तेव्हा राधिका म्हणाली, ‘‘त्यांना पाहिल्यानंतर माझा पाय दुखायचा थांबला आहे.’’ तेव्हा मी तिला म्हणाले, ‘‘तू कृतज्ञता व्यक्त कर. तुला एवढी चांगली अनुभूती आली.’’
२. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आपल्याला रामनाथी आश्रमात घेऊन जाणार आहेत’, याची वाट पहाणारी कु. राधिका घोळे !
सौ. योगेश्री घोळे : राधिका लहानपणापासून ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील त्यांचे छायाचित्र पाहून पुष्कळ रडत असे. एकदा आम्ही दोघीच घरी होतो. तेव्हा ती रात्री दीड वाजता जोराजोराने रडू लागली. मी तिला विचारले, ‘‘काय झाले ?’’ ती म्हणाली, ‘‘प.पू. आबा (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला नेहमी सांगतात की, ‘मी तुला घेऊन जाण्यासाठी गाडीतून येईन’; परंतु ते अजूनपर्यंत मला नेण्यासाठी आले नाहीत.’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘आता तू झोप. ते उद्या येतील.’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘तू नेहमी मला असेच सांगतेस आणि प.पू. आबा येत नाहीत.’’ आता येथे आल्यावर ती म्हणते, ‘‘मला येथे श्रीकृष्णबाप्पाही दिसत आहेत.’’ तिने त्याचे वर्णनही असे केले की, ‘जणू तिला प्रत्यक्ष श्रीकृष्ण दिसत आहे.’
३. रामनाथी आश्रमात आल्यावर ‘प.पू. आबांचे ग्रंथातील छायाचित्र न पहाता त्यांना प्रत्यक्ष पहायचे आहे’, असे सांगणारी कु. राधिका घोळे !
सौ. योगेश्री घोळे : आताही मी येथे येण्याच्या दोन दिवस आधी तिला सांगितले होते, ‘‘आपण रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाणार आहोत.’’ तेव्हा तिला पुष्कळ आनंद झाला. ती म्हणाली,‘‘आता मी प.पू. आबांचे ग्रंथातील छायाचित्र पहाणार नाही. मला माझ्या डोळ्यांनी त्यांना पहायचे आहे.’’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मग पाहिलेस ना मला आता ? मला पाहून तुला काय वाटले ?
कु. राधिका घोळे : पुष्कळ छान वाटले.
श्री. महेश घोळे : ती बोलायला शिकली, तेव्हापासून तिला कोणताही श्लोक संस्कृत असला, तरीही तो त्वरित मुखोद्गत होतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : छान !
सौ. योगेश्री घोळे : आता सर्व जण म्हणतात की, ‘ती प्रथमच आश्रमात आली असली, तरी सर्वांमध्ये लगेच मिसळून गेली आहे. तिच्या वागण्यातून ‘ती प्रथमच आश्रमात आली आहे’, असे जाणवतच नाही.’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तिची समष्टी प्रकृती आहे ना ! ती सर्व ठिकाणी जाऊन प्रसार करणार !
‘आपल्या गायी,
कुत्रे आणि मांजरे यांना
आश्रमात नेऊया’,
असे सांगणारी
कु. राधिका घोळे
आश्रमात येणार असल्याचे
समजल्यावर ती म्हणाली,
‘‘आपणच एकटे कसे काय
जायचे ? हे सर्व गायी, कुत्रे आणि
मांजरेसुद्धा आपलीच आहेत
ना ! त्यांना घेऊन जायचे नाही
का ? त्यांनासुद्धा भगवंताचे
दर्शन व्हायला पाहिजे ना !’’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : किती छान ना !’
४. कु. राधिकाचा पाळीव प्राण्यांप्रती प्रेमभाव !
श्री. महेश घोळे : आम्ही शेतावर रहातो. तेथे सर्व पाळीव प्राणी आहेत. तेथे मांजरी, कुत्रे, गाय आणि वासरे आहेत. राधिकाला सर्वांप्रती जिव्हाळा आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : छान !
३. साधिकेच्या घरातील पाळीव प्राण्यांनाही सात्त्विकतेची जाण आहे !
एक साधक : ताई आमच्या केंद्राजवळच रहाते. ताईचे तेथील जीवन अत्यंत कष्टमय आहे. ते दोघे जण शेती करतात. ‘कंटेनर टाईप’ घर (टीप) असते, तसे त्यांनी घर बनवले आहे. (टीप : जहाजावर मालवाहतुकीसाठी वापरले जाणारे मोठे कंटेनर (लोखंडी बॉक्स) यांत पालट करून रहाण्यायोग्य बनवलेले घर.)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : अरे बाप रे !
श्री. सागर शिरोडकर : घरात ‘सोलर’ लावले आहे. ताई तेथे पुष्कळ चांगला प्रसार करते. त्यांच्याकडील कुत्री आणि मांजरी दुसरे लोक तेथे आल्यावर जागरूक होऊन भुंकतात, ओरडतात; मात्र साधक त्यांच्या घरी जातात, तेव्हा ती कुत्री आणि मांजरी साधकांच्यासमोर येऊन बसतात आणि त्यांना काही करत नाहीत.
५. बाजारपेठेत भाजी विकण्यासाठी गेल्यावर अनेक जण भाज्या विकत घेण्यासाठी येत असणे
एक साधक : ते दोघेच एकमेकांना साहाय्य करतात. त्यांना साहाय्याला दुसरे कुणीही नाही. शेतीची सर्व कामे करणे, गायीची धार काढणे, असे सर्वकाही ते दोघेच करतात.
सौ. योगेश्री घोळे : गुरुदेव, आम्ही शेतात पालक, मेथी अशा भाज्या लावतो. त्यांची चव आणि गुणवत्ता पहिल्यांदा जशी होती, तशी अजूनपर्यंत टिकून आहे. आम्ही बाजारपेठेत भाजी विकण्यासाठी गेल्यावर अनेक जण त्यांनी दुसर्यांकडे लावलेली रांग सोडून आमच्याकडे येतात. तेव्हा आम्हाला पुष्कळ आश्चर्य वाटते. हे सर्व आपणच करत आहात. आमच्या हातात काहीच नाही. आमचे संपूर्ण नियंत्रण आपल्याच हाती आहे.
श्री. महेश घोळे : आम्ही आश्रमात राहून शिकलो. आम्ही स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न केले. मी आता समाजात भाज्या विकायला घेऊन जातो. माझा लोकांशी संपर्क येतो, तर त्यांना पुष्कळ चांगले वाटते. काही वेळा तर असे होते की, ‘काही लोकांना भाजी विकत घ्यायची नसते, तरीही ते केवळ आम्हाला भेटण्यासाठी येतात.’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : कमाल आहे ना ! आपण शेती करतो, तर कसा प्रसार करणार ? असे विचारतो. तर हे याचे उत्तर आहे.
एक साधक : त्यांच्या शेतात ज्या भाज्या आहेत, त्या रासायनिक खते न घालता पिकवल्या जातात, म्हणजे गोमूत्र, शेणखत यांचा वापर करून ते भाज्यांचे पिक घेतात.’
| • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !