तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत विधान

भाग्यनगर (तेलंगाणा) – गांधी कुटुंबाला आवश्यकता भासल्यास आर्थिक साहाय्य देण्यासाठी सिद्ध रहावे. जर गांधी कुटुंबाने साहाय्य मागितले, तर मी १ सहस्र कोटी रुपयेही जमा करू शकतो, असे विधान तेलंगाणातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी येथील हरिता व्हॅली रिसॉर्टमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत केले. या विधानावरून भाजप आणि भारत राष्ट्र समिती या पक्षांनी तेलंगाण राज्य काँग्रेस कमिटीला गांधी कुटुंबाचे ‘एटीएम्’ (ऑटोमेटेड टेलर मशीन – स्वयंचलित रोकड वितरण यंत्र) म्हटले.
"If the Gandhi family asks, we'll collect ₹1,000 Cr".
Telangana CM Revanth Reddy sparks controversy…
Can India break free? If parties prioritize fund collection over governance, can the nation ever achieve true progress?#Congress #Corruption #NavjotKaur #CongressExposed… https://t.co/jDKNyFMs8S pic.twitter.com/dRWxNldLeu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 24, 2026
मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे ! – भाजप
जेव्हा राज्याचा तिजोरीवर ताण आहे, कल्याणकारी योजना प्रलंबित आहेत आणि कर्मचार्यांच्या पगाराला उशीर होत आहे, तेव्हा मुख्यमंत्री एका कुटुंबासाठी निधी गोळा करण्याबद्दल कसे काय बोलू शकतात ? मुख्यमंत्र्यांना याविषयी लाज वाटली पाहिजे, असे भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते एन्.व्ही. सुभाष यांनी म्हटले आहे.
Shocking statement by CM Revanth Reddy!
While Telangana’s youth await DSC notifications and farmers struggle for Rythu Bharosa, the CM boasts about mobilising ₹1,000 CRORE for the “financial requirements” of the Gandhi family.
Is Telangana’s hard-earned revenue meant for… pic.twitter.com/LuyDdZdlBO
— NV Subhash (@nvsubhash4bjp) February 22, 2026
उपमुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
यावर स्पष्टीकरण देतांना उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क यांचे म्हटले की, मुख्यमंत्र्यांचा उद्देश सामूहिक शक्तीबद्दल होता, कोणत्याही बेकायदेशीर वसुलीबद्दल नव्हता. (या स्पष्टीकरणावर शेंबडे पोर तरी विश्वास ठेवणार आहे का ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !