
‘श्रीराम-रावण लंकेच्या युद्धाच्या वेळी मेघनाद आणि लक्ष्मण यांचे युद्ध झाले. त्या युद्धात मेघनादाने चालवलेली शक्ती लक्ष्मणाला लागली आणि लक्ष्मण बेशुद्ध झाला. लक्ष्मणावर उपचार करण्यासाठी श्रीरामाने हनुमानाला सुषेण वैद्याकडे पाठवले. सुषेण हा लंकेतील रावणाच्या राज्यातील वैद्य होता. त्यामुळे त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला, ‘शत्रूपक्षातील योद्धा जखमी झाल्यावर मी त्याच्यावर उपचार करू शकतो का ? हा देशद्रोह ठरेल का ? यासाठी रावण मला मृत्यूदंडही देऊ शकतो.’ अशा प्रसंगी महापुरुष उत्तर शोधण्यासाठी ध्यान करत असत. सुषेणने ध्यान केले आणि त्याला उमगले, ‘रुग्ण कुणीही असो, ‘त्याच्यावर उपचार करणे’, हा माझा धर्म आहे.’ त्याप्रमाणे सुषेणने लक्ष्मणावर उपचार केले. पुढे ‘इंडियन रेड क्रॉस’ची हीच नीती ठरली.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०२२)
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !