
गुरदासपूर (पंजाब) – येथील भारत-पाक सीमेवरील अधिया गावातील तपासणी चौकीत अज्ञातांकडून रात्री गोळीबार करून पोलीस अधिकारी आणि गृहरक्षक दलाचा सैनिक यांची २ दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. याचे अन्वेषण पोलिसांकडून चालू असतांनाच ‘तहरीक-ए-तालिबान हिंदुस्थान’ या संघटनेने हत्येचे दायित्व स्वीकारल्याचा दावा करणारी पत्रके सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाली आहे. या पोस्टमध्ये संघटनेचा ध्वज, चिन्ह आणि दोन्ही मृतांची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहेत. ही माहिती हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत प्रसारित करण्यात आली आहे. पोलीस या दाव्यांची सत्यता पडताळत असून प्राथमिक स्तरावर ही अपरिचित संघटना असल्याचे सांगत आहेत.
संपादकीय भूमिकापंजाबवर आतंकवादाचे सावट आहे, हे दर्शवणारी घटना ! |
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले