|

काठमांडू (नेपाळ) – नेपाळच्या मधेश प्रांतातील भारताच्या सीमेजवळील रौतहट जिल्ह्यात गौर नगरपालिका परिसरात मशिदीसमोरून हिंदूंनी सवाद्य वरात काढल्यामुळे मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. या वेळी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. यात २ पोलिसांसह ८ जण घायाळ झाले. हिंसाचाराच्या प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये मुसलमान ‘५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास हिंदूंना फाडून टाकू’, अशी धमकी देत असल्याचे दिसत आहे. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे. तरीही गौरच्या आतील भागांत तणाव कायम असून जाळपोळीच्या घटना पूर्णपणे थांबलेल्या नाहीत.
🔥 Nepal Erupts: “Remove Police for 5 Minutes, We’ll Tear Hindus Apart” – Open Threat Amid Violence
Shocking scenes from Nepal after a Hindu wedding procession with music passed a mosque in Gaur Municipality near the Indo-Nepal border.
⚠️ 8 injured, including 2 policemen – 18… pic.twitter.com/DymRgoYTw8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 22, 2026
हिंसाचाराची पार्श्वभूमी
गौर नगरपालिका-६ मधील सनगडा गावात १९ फेब्रुवारीच्या संध्याकाळी मशिदीत रमझानच्या काळातील नमाजपठण चालू होते. त्याचवेळी मशिदीसमोरून वाद्यांसह वरात जात होती. वाद्य वाजवल्यावरून मुसलमानांनी आक्षेप घेत वरात रोखली. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. या वेळी एका वाहनाला आग लावण्यात आली. परिस्थिती बिघडू नये; म्हणून प्रशासनाने शेकडो पोलीस तैनात केले.
समेटानंतरही पुन्हा दगडफेक
२० फेब्रुवारीला येथे दिवसभर तणाव कायम राहिला; मात्र संध्याकाळी दोन्ही बाजूंमध्ये ६ सूत्रांवर समेट झाला. तरी २१ फेब्रुवारीच्या सकाळी ९ वाजता मुसलमानांकडून पुन्हा दगडफेक चालू झाली. याचा परिणाम गौरच्या प्रभाग क्रमांक ४, ५ आणि ६ मध्येही दिसून आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. अखेर प्रशासनाला संचारबंदी लागू करावी लागली.
सैन्य तैनात, तरी तणाव कायम
मुसलमानांनी अनेक वाहनांना आग लावली आणि घरांची तोडफोड केली. पोलिसांच्या माहितीनुसार ६ मोटारसायकली आणि २ जीप जाळण्यात आल्या. गौर नगरपालिका-४ मधील मचकुटिया टोल येथे एका दुचाकीलाही आग लावण्यात आली. संचारबंदी लागू केल्यानंतर नेपाळ पोलीस आणि नेपाळी सैन्य तैनात करण्यात आले आहे. मुख्य रस्ता परिसर तुलनेने शांत असला, तरी आतील भागांत अद्याप तणावपूर्ण स्थिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत १८ मुसलमानांना अटक केली आहे.
प्रमुख जिल्हाधिकारी दिनेश सागर भूसाल यांनी सांगितले की, पूर्वेला मुडबलवा गेट, पश्चिमेला लालबकैया बंधारा, उत्तरेला बम कालवा आणि दक्षिणेला गौर भन्सार कार्यालयापर्यंत संचारबंदी प्रभावी आहे.
संपादकीय भूमिका
|
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !