पाकिस्तानचा अफगाणिस्तानमधील आतंकवाद्यांच्या कथित तळांवर हवाई आक्रमण : १७ जणांचा मृत्यू

काबुल (अफगाणिस्तान) – पाकिस्तानला आमच्याकडून ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल आणि एअर स्ट्राईकचा सूड घेतला जाईल, अशी चेतावणी अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने दिली आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तान प्रांतांमध्ये पाकिस्तानी वायूदलाने कथित आतंकवाद्यांच्या तळांवर हवाई आक्रमण केले. यात एकाच कुटुंबातल्या १७ जणांचा मृत्यू झाला.
१. तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी ‘पाकिस्तानचे हे कृत्य निषेधार्ह आहे. आम्ही याचा सूड नक्की घेऊ. पाकिस्तानने हवाई सीमेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला उत्तरादाखल कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे. योग्य वेळ आली की, आम्ही पाकिस्तानला उत्तर देणारच.
२. पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार म्हणाले की, पाकिस्तानने इस्लामिक स्टेट गटाच्या एका संलग्न संघटनेलाही लक्ष्य केले. या संघटनेने इस्लामाबादमधील एका मशिदीवर अलीकडेच झालेल्या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले होते, ज्यामध्ये ३१ लोक मृत्यूमुखी पडले होते आणि १६० हून अधिक घायाळ झाले होते. वर्ष २००८ च्या मॅरियट हॉटेल बाँबस्फोटानंतर इस्लामाबादवरील हे सर्वांत घातक आक्रमणांपैकी एक होते.
संपादकीय भूमिकापाकिस्तान भारतात आतंकवादी कारवाया करतो आणि मग भारताने अशाच प्रकारे पाकमधील आतंकवाद्यांच्या तळांवर आक्रमण केल्यावर थयथयाट करतो; मात्र हाच पाक अफगाणिस्तानमध्ये आतंकवादी तळांवर आक्रमण करतो, हा दुटप्पीपणाच होय ! |
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan