Banswada : हिंदु महिला भक्तीगीते ऐकत असतांना मुसलमानाने त्याला आक्षेप घेतल्याने तणाव !

बांसवाडा (तेलंगाणा) येथील घटना

प्रतिकात्मक चित्र

बांसवाडा (तेलंगाणा) – येथे २० फेब्रुवारीला सायंकाळी रिलायन्स मार्ट केंद्रात कार्यरत असलेली एक महिला भक्तीगीते ऐकत होती. त्या वेळी एक मुसलमान व्यक्ती तिच्याकडे येऊन ती ‘इतर गाणी का लावत नाही ?’, असा प्रश्‍न विचारला. संभाषणाच्या वेळी त्या व्यक्तीने एक व्हिडिओही चित्रित केला. यामुळे वाद झाला आणि दोन्ही बाजूंनी जमाव जमा झाला. त्यांच्यात धक्काबुक्की होऊन तणाव निर्माण झाला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. महिलेच्या तक्रारीवरून बांसवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.