
सनातन श्वास माझा, प्राण सनातन ।
सनातन गुरु माझा, बंधू सनातन ।।
धर्म-अध्यात्म यांचे नित्य करी विवेचन ।
भाषाशुद्धीसह संस्कारांचे करी प्रबोधन ।।
हिंदु संस्कृती-इतिहासाचे देई प्रशिक्षण ।
मातृभूमी-धर्मासाठी त्यागाची शिकवण ।।
स्वाभिमानी हिंदुत्वाचे निर्भीड दर्पण ।
तन-मन-धन यांचे अर्पण ।।
वाचे नित्य सनातन अमृताचे पान ।
मृतप्राय हिंदुत्वाला देई संजीवन ।।
अधर्म-अज्ञानाचे करी उच्चाटन ।
‘सनातन प्रभात’ला दैवी अधिष्ठान ।।
धर्महानी रोखण्या मी घेतले हे वाण ।
अर्पितो मी आज माझे पंचप्राण ।।
काया, वाचे, मने राहो नित्य सनातन ।
प्रार्थना ही देवा तुला करी विनवून ।।
– श्री. श्रीधर पाटील, नवीन पनवेल, जिल्हा रायगड
महिमा सनातनचा ।
हा महिमा सनातनचा । हा प्रकाश ज्ञानदीपाचा ।।
मार्ग आहे जीवनाचा । सुगंध भक्तीभावाचा ।।
व्यवहार शब्दसुमनांचा ।। अभिमान मातृभूमीचा ।।
त्याग क्रांतीकारकांचा । हुंकार हिंदुत्वाचा ।।
अंगार क्षात्रतेजाचा । झंकार पराक्रमाचा ।।
आवाज सह्याद्रीचा बाणा शिवरायांचा ।।
गौरव राष्ट्रभक्तीचा । विजय स्वाभिमानाचा ।।
प्रसाद गुरुकृपेचा । मंत्रमोक्ष मुक्तीचा ।।
मुकुट वृत्तपत्रांचा । आविष्कार पत्रकारितेचा ।।
बहर प्रतिभेचा । प्रयत्न सत्यकथनाचा ।।
– श्री. श्रीधर पाटील, नवीन पनवेल, जिल्हा रायगड
आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च ; मात्र विद्यार्थी मूलभूत सुविधांपासून वंचित !
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?