-
भिगवण (पुणे) येथील हिंदु मुलीचे अपहरण प्रकरण !
-
दोन्ही आमदार लव्ह जिहादच्या आरोपावर ठाम

पुणे – इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील हिंदु तरुणीच्या अपहरण प्रकरणातील संबंधित तरुणी तरुणासह मध्यरात्री बारामती शहर पोलीस ठाण्यात उपस्थित झाली. त्यांना कह्यात घेऊन पोलिसांकडून पुढील प्रक्रिया चालू आहे. याची माहिती तरुणीच्या आई-वडिलांना मिळताच ते पोलीस ठाण्यात उपस्थित झाले; परंतु तरुणीने आईसमवेत जाण्यास नकार दिल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांसमोर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा पुनरुच्चार केला.
| आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांचा लव्ह जिहादचा आरोप
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या मुलीला ती अल्पवयीन असल्यापासून लव्ह जिहादमध्ये अडकवले गेले असू शकते. मुलीला वडील नसल्यामुळे ती फसवली गेली असू शकते, असे प्रसारमाध्यमांपुढे सांगितले. |
अधीक्षक गिल म्हणाले, ‘‘या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला असून सर्व बाजूंनी अन्वेषण करण्यात येत आहे. तरुणीने न्यायालयासमोर, तसेच तिच्या कुटुंबियांसमोर तिचे म्हणणे मांडले आहे. कुटुंबियांनी वेगळे आरोप केल्यामुळे पोलिसांकडून अधिक अन्वेषण चालू आहे.’’ तरुणीने आईकडे जाण्यास नकार दिला आहे. तिला कुणाकडे जायचे, हे तिला विचारले जाईल. अन्यथा मुलींच्या वसतिगृहात तिला ठेवले जाईल. मुलीच्या आईची तिची भेट झालेली आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून पोलीस पुरावे गोळा करत आहेत. अन्वेषण पूर्ण झाल्यानंतर सत्य बाहेर येईल, असेही गिल यांनी सांगितले.
| आरोप करणार्यांनी वस्तूस्थिती पहावी ! – भाजपचे आमदार राहुल कुल
भाजपचे आमदार राहुल कुल यांचे या प्रकरणात नाव आले. मुलाच्या छायाचित्रात मागील भिंतीवर राहुल कुल यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यांनी या प्रकरणी संबंधित मुलाला पाठिशी घातल्याचा आरोप मुलीच्या मामाने केला. त्यानंतर याविषयी बोलतांना राहुल कुल म्हणाले, ‘‘मलाही मुलगी आहे. माझ्याच घरात महिला पदाधिकारी राहिलेल्या आहेत. महिलांचा प्रश्न कसा हाताळावा ? याची जाण मला आहे. आरोप करणार्यांनी वस्तूस्थिती पहावी. राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये.’’ |
मुलीच्या आईने प्रसारमाध्यमांपुढे सांगितले की, मुलगी त्या गुंड मुलाकडे दिल्यास त्या स्वत: आत्महत्या करतील.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
समान नागरी कायदा अस्तित्वात येणे, ही काळाची आवश्यकता ! – मिलिंद एकबोटे, कार्याध्यक्ष, समस्त हिंदु आघाडी
भारतीय संस्कृती सहस्रो वर्षे प्राचीन ! – डॉ. नीलेश ओक, प्रख्यात संशोधक
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या