खासगी बसमध्ये प्रवास करणार्‍या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरून प्रवास करणार्‍या एका २१ वर्षीय हिंदु तरुणीचा खासगी बसमध्ये विनयभंग केल्याची घटना ३० जून या दिवशी उघडकीस आली आहे. पीडित हिंदु तरुणी एका खासगी बसने पुणे ते मुंबई असा प्रवास करत होती. या प्रवासादरम्यान तिच्या शेजारी महंमद अन्सारी नावाचा प्रवासी बसला होता, तर आरोपी उनेस शेख वसीम हा तिच्या पाठीमागील आसनावर बसला होता. प्रवासात पीडित तरुणी थकल्यामुळे आसनावर झोपली होती. याचाच अपलाभ घेत उनेस शेख वसीम याने पीडितेच्या शरीराला अश्लील स्पर्श करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी येथील शिरगाव-परंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

अशा वासनांधांना शरीयतनुसार कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास त्यात चुकीचे ते काय !