
चिक्कबळ्ळापूर (कर्नाटक) – केरळमधील २६ वर्षीय महंमद संजीत अली या लव्ह जिहाद्याने कर्नाटकातील चिक्कबळ्ळापूर येथील २६ वर्षीय भौतिक चिकित्सक (फिजिओथेरपिस्ट) साई सुरभी हिची हत्या केली. येथील एका घरात सुरभीचा मृतदेह आढळला. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. तिच्या कुटुंबियांनी आरोप केला की, हे लव्ह जिहादचेच प्रकरण असून अली याने मुलीला अमली पदार्थांचे व्यसन लावले होते. हे दोघे महाविद्यालयाच्या दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. यापूर्वी दोघे केरळला पळून गेले होते. त्यांच्या या संबंधांना सुरभीच्या कुटुंबियांचा विरोध होता.
बागलकोटे (कर्नाटक) येथेही मुसलमानाकडून हिंदु तरुणीची हत्या

बागलकोटे जिल्ह्यातील इलकल येथे विणकर कुटुंबातील अक्षता नावाची तरुणी ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रामुळे मारली गेली. नानासाब बुड्डा या मुसलमान तरुणाने तिच्याशी मैत्री करून तिला बेंगळुरूला नेले. तिची अश्लील छायाचित्रे काढली. तिला २ वर्षे एका घरात कोंडून ठेवले. या कालावधीत त्याने तिच्यावर बलात्कार करण्यासह तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला गेला. तिचे धर्मांतर करण्यात अपयश आल्यानंतर त्याने तिची हत्या केली. ‘हिंदु जागरण वेदिके’ने या घटनेचा निषेध केला आहे.
चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठ परिसराच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा !
कर्नाटक : मशिदीसमोर फटके फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी शेतकर्याचा हात तोडला !
केंद्रशासनाकडून ‘धर्मस्वातंत्र्य’ विधेयकास संमत्ती मिळाल्यावर धर्मांतराच्या घटनांत त्या अंतर्गत कारवाई होणार ! -मुख्यमंत्री
मुंबईत ६ हॉटेलसह बेकरी आणि क्लब यांचे परवाने निलंबित : १९ जणांना अटक !
शामली (उत्तरप्रदेश) येथील आयुष मलिक याने इस्लाम सोडून पुन्हा हिंदु धर्म स्वीकारला !
पतीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पत्नीला पोटगी देण्याची आवश्यकता नाही ! : The Karnataka High Court