२१.१.२०२६ या दिवशी कुंबेली (रामनगर, जिल्हा बेळगाव) येथील मारुति हरिश्चंद्र मिराशी (वय ३९ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अध्यात्मप्रसाराशी संबंधित सेवा करत असत, तसेच सनातनच्या विविध उपक्रमांत सहभाग घेत असत. २१.२.२०२६ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. श्री. ज्ञानेश्वर आपाना गावडे, रामनगर, जिल्हा बेळगाव.
१ अ. ‘मारुतिदादा सतत आनंदी आणि हसतमुख असत.
१ आ. सेवेची तळमळ
१. मारुतिदादा कोणतीही सेवा परिपूर्ण करत असत.
२. दादांना कुठल्याही साधकाने कोणतीही सेवा सांगितल्यावर ते ती सेवा पटकन स्वीकारत असत.
३. दादा म्हणायचे की, मी शेवटपर्यंत सेवाच करणार. त्यांच्या निधनाच्या आदल्या दिवशी त्यांनी बाहेरगावी जाऊन ‘आनंदी जीवनासाठी साधना’, या प्रवचनाशी संबंधित सेवा केली.
१ इ. ते साधकांना साधनेविषयी दृष्टीकोन देऊन आधार देत असत. ते रामनगरमधील साधकांचा आधारस्तंभ होते.
१ ई. संतांप्रतीचा भाव : दादांना पू. गुंजेकरमामा (पू. शंकर गुंजेकर, सनातनचे ५६ वे संत, वय ६२ वर्षे) यांचे सतत मार्गदर्शन मिळत असे. पू. मामा दादांना सांगायचे, ‘‘काहीही झाले, तरी सेवा सोडायची नाही.’’ पू. मामांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी शेवटपर्यंत सेवा केली.
१ उ. दादा सतत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असत.
१ ऊ. दादांच्या पार्थिवाकडे पाहिल्यावर मला चांगले वाटले. त्या वेळी मला कोणताही त्रास जाणवला नाही.
‘मारुतिदादांना पुढची गती मिळावी’, अशी मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करतो.’

‘मारुति मिराशी हे एका हाताने अपंग असूनही ते सर्व प्रकारच्या सेवा तळमळीने करत असत. पू. गुंजेकरमामांनी त्यांना सांगितले होते, ‘‘काहीही झाले, तरी सेवा सोडायची नाही.’’ मारुति मिराशी यांनी संतांचे तंतोतंत आज्ञापालन केले. त्यांनी निधनाच्या आदल्या रात्रीपर्यंत सेवा चालूच ठेवली होती. ‘तळमळीने सेवा करणे’ आणि ‘संतांचे आज्ञापालन करणे’, या गुणांमुळे त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१९.२.२०२६)
२. श्री. गोविंद नाळकर, रामनगर, जिल्हा बेळगाव.
२ अ. इतरांचा विचार करणे : ‘वर्ष २०२५ मध्ये फोंडा (गोवा) येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी माझ्या शारीरिक अडचणीमुळे मला रांगेत उभे राहून महाप्रसाद घेण्यास अडचण येत होती. तेव्हा दादा स्वतः रांगेत उभे राहून माझ्यासाठी महाप्रसाद आणत असत.
२ आ. दादांना कधीही राग येत नसे. त्यांच्या चेहर्यावर नेहमी हास्य दिसत असे. ते सर्व साधकांशी प्रेमाने बोलत असत.’
३. कु. श्रद्धा गावडे (वय २० वर्षे), रामनगर, जिल्हा बेळगाव.
अ. ‘दादा सर्वांशी लगेच जवळीक साधत असत.’
४. श्री. विकास गुरव, लोंढा, जिल्हा बेळगाव.
४ अ. सेवाभाव : ‘वर्ष २०२४ मध्ये गुरुपौर्णिमेचे आयोजन मारुतिदादाकडे आणि माझ्याकडे होते. तेव्हा दादांनी सेवेचे छान नियोजन केले होते. ते दायित्व घेऊन आणि उत्साहाने सेवा करत असत. त्यांनी समाजातील लोकांना जोडून ठेवले होते.’
शारीरिक त्रास असूनही झोकून देऊन आनंदाने सेवा करणारे कै. मारुति मिराशी !

‘मारुति मिराशी कोणत्याही सेवेला ‘नाही’ म्हणत नसत. ते प्रसाराच्या संबंधित सेवा करत असत. त्यांचा एक हात अपंग होता (त्यांच्या हातात संवेदना नव्हती), तरीही ते दुचाकी गाडी चालवून सत्संग सेवकांच्या समवेत सत्संगाला जात असत. त्यांना कुठलीही सेवा सांगितल्यावर ते सेवेची व्याप्ती काढून सेवा करत असत. त्यांना एखाद्या वेळी सेवा मिळाली नाही, तर ते स्वतः भ्रमणभाष करून सेवेविषयी विचारत असत. दिलेल्या सेवेविषयी काही न समजल्यास ते लगेच त्याविषयी विचारून घेत असत. निधन होण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी प्रवचन घेण्याच्या सेवेत सहभाग घेतला. त्यांना शारीरिक त्रास होते; पण ते त्याविषयी कधीही कुणाकडे बोलत नसत. ते नेहमी मिळून-मिसळून आणि आनंदात रहात असत.
‘मारुतिदादांना सद्गती मिळो’, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करतो.’
– (पू.) शंकर गुंजेकर (सनातनचे ५६ वे संत, वय ६२ वर्षे), रामनगर, जिल्हा बेळगाव. (१४.२.२०२६)
५. श्री. आकाश हरवाळकर, लोंडा, जिल्हा बेळगाव.
अ. ‘मारुतिदादा घरातील अडचणी सहजपणे सांगत असत आणि त्यावर उपाय विचारून घेऊन प्रयत्न करत असत.
आ. वर्ष २०२२ मध्ये गुरुपौर्णिमेच्या वेळी मी दादांच्या समवेत सेवा केली. तेव्हा त्यांच्यामधील सेवाभाव पाहून मला कृतज्ञता वाटत असे. ते संयम ठेवून आणि झोकून देऊन सेवा करत असत.
इ. त्यांचा गुरूंप्रती पुष्कळ भाव होता.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १४.२.२०२६)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आणि संतांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
लक्षात घ्या, विज्ञानाची ही मर्यादा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
मंदिरातील पुजारी मंदिराचे आध्यात्मिक वैभव वृद्धींगत करणारे असावेत !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !