
‘मंदिर हे समष्टी स्तरावरील (सामाजिक स्तरावरील) उपासनेचे आणि चैतन्य प्रक्षेपणाचे केंद्र असते. त्यामुळे त्या मंदिराचा आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक लाभ होण्यासाठी कारणीभूत ठरणार्या विविध घटकांपैकी मंदिरातील पुजारी हे एक महत्त्वाचा घटक असतात.
मंदिरातील पुजारी त्या देवतेसाठीचे पूजाउपचार आदी किती भावपूर्ण करतात, यावरही मूर्तीतून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचे प्रमाण अवलंबून असते. त्याचसमवेत ते पुजारी मंदिरात येणार्या भक्तांना त्या देवतेच्या चैतन्याचा अधिकाधिक लाभ व्हावा, या उद्देशाने किती तळमळीने प्रयत्न करतात, यावर त्या मंदिराचा आध्यात्मिक स्तरावरील लाभ ठरतो. एकूणच मंदिराचे आध्यात्मिक वैभव मंदिरातील पुजार्यांची व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांवर अवलंबून असते. यासाठी मंदिरातील पुजारी हे चांगली साधना करणारेच असावेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
लक्षात घ्या, विज्ञानाची ही मर्यादा !
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !