महापालिकेत महापौर आणि उपमहापौर यांनी पुन्हा टिपूचे चित्र लावल्या प्रकरणी मालेगावातील हिंदूंची चेतावणी !

नाशिक – मालेगावच्या उपमहापौरांनी पुन्हा टिपूचे चित्र पुन्हा लावले, तर मालेगावातील हिंदु समाज महानगरपालिकेला कोणत्याही प्रकारचा कर भरणार नाही. उपमहापौरांनी पुन्हा चित्र लावण्याचे कृत्य केले, तर त्यांना शहरात फिरू दिले जाणार नाही. मालेगावातील हिंदु समाज टिपू किंवा औरंगजेब यांना नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज यांना आपला आदर्श मानतो. मालेगाव महानगरपालिकेत टिपू सुलतानचे चित्र लावू दिले जाणार नाही, अशी चेतावणी मालेगावमधील ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने देण्यात आली आहे.
मालेगावमध्ये महानगरपालिकेमध्ये उपमहापौर शान-ए-हिंद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या दालनात टिपू सुलतानचे चित्र लावले होते. त्यानंतर ‘सकल हिंदु समाजा’कडून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर कार्यालयाचे कामकाज करण्याच्या निमित्ताने ते चित्र काढले असल्याचे माध्यमांनी दाखवले. मालेगावच्या उपमहापौरांनी दालनातील कामकाज झाल्यानंतर टिपू सुलतानचे चित्र पुन्हा लावणार असल्याचे विधान केल्यानंतर ‘सकल हिंदु समाजा’ने तीव्र विरोध चालू केला आहे.
या प्रकरणी हिंदूंचे तारणहार छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रूरकर्मा टिपू सुलतान यांची तुलना करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यभरातून विरोध झाल्यावर क्षमायाचना केली होती.
संपादकीय भूमिका‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशीच मालेगावचे महापौर आणि उपमहापौर यांची भूमिका आहे. मुसलमानांच्या हातात सत्ता गेली, ते काय करू शकतात, याची ही केवळ झलक आहे ! |
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !