
मिरज, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिलेल्या आदेशानुसार येथील प्रार्थनास्थळे, दर्गे आणि मशिदी यांवरील भोंगे अवैधरित्या वाजवण्यात येत असून यामुळे हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. त्यामुळे ‘मिरज नगर परिसरातील मशिदी आणि दर्गे यांवरील भोंगे लवकरात लवकर उतरवा’, अशा मागणीचे निवेदन हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय, मिरज शहर पोलीस, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले. ध्वनीप्रदूषण, तसेच रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांना त्रासदायक ठरणारे हे भोंगे न्यायालयीन आदेशानुसार बंद करावेत; अन्यथा न्यायालयात या संदर्भात अवमान याचिका प्रविष्ट करू, अशी चेतावणी या निवेदनाद्वारे दिली आहे. या वेळी सर्वश्री शहरप्रमुख सोमनाथ गोटखिंडे, प्रकाश जाधव, निखिल शिंदे, यश पाटील, विजयसिंह राजपूत, विकास पाटील, वृषभकुमार तानगे, अनिल तलवार, कृष्णा नायडू, विजय पाटील, प्रेम देसाई यांसह हिंदु एकता आंदोलनाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मिरज शहर पोलीस ठाण्याच्या वतीने लवकरच या संदर्भात कडक कारवाई करू, असे आश्वासन पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी उपस्थितांना दिले.
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे
सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला
उद्योगस्नेही धोरण आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटीबद्ध ! – डॉ. उदय सामंत, उद्योगमंत्री