नवी देहली – गेल्या वर्षी देहलीतील लाल किल्याजवळ झालेला भीषण बाँबस्फोट एका मोठ्या देशव्यापी षड्यंत्राचा भाग असून त्यामागे ‘व्हाईट कॉलर’ आतंकवादी मॉड्यूलचा ( यात आतंकवादी सामान्य माणसांप्रमाणे लोकांमध्ये रहातात आणि गर्दीच्या ठिकाणी आक्रमणे करून पळून जातात) हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुशिक्षित आणि व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या डॉक्टरांनी एकत्र येऊन जम्मू-काश्मीरसह देशातील प्रमुख शहरांमध्ये विध्वंसक कारवाया करण्यासाठी ‘अंसार अंतरिम’ नावाची एक नवीन आतंकवादी संघटना उभी केली होती. या मॉड्यूलचा मुख्य सूत्रधार पुलवामा येथील डॉ. उमर-उन-नबी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
१. उमरनेच १० नोव्हेंबर २०२५ या दिवशी लाल किल्ल्याबाहेर स्फोटकांनी भरलेल्या चारचाकीचा स्फोट घडवून आणला होता, ज्यामध्ये १० निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला होता. उमर वर्ष २०१६ पासून कट्टरतावादी विचारसरणीने प्रेरित झाला होता आणि त्याने यापूर्वी दोनदा आतंकवादी गटात सहभागी होण्याचा प्रयत्न केला होता.
२. एप्रिल २०२२ मध्ये श्रीनगरमध्ये झालेल्या एका गुप्त बैठकीत या कटाची बीजे रोवली गेली होती. या बैठकीत मुझम्मिल गनी, उमर-उन-नबी, आदिल राथेर आणि मौलवी इरफान यांसारख्या संशयितांनी ‘अंसार अंतरिम’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आदिलची ‘अमीर’ म्हणजेच प्रमुख म्हणून, तर इरफानची उपप्रमुख आणि मुझम्मिल गनी याची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
३. जुन्या आतंकवादी संघटनांशी संपर्क तुटल्यामुळे या शिक्षित तरुणांनी स्वतःचे नवीन मॉड्यूल बनवले होते. अल्-कायदाशी संबंधित असलेल्या ‘अंसार’ या शब्दाचा वापर करून त्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता.
संपादकीय भूमिकाएखाद्या आतंकवादी संघटनेचे कंबरडे मोडल्यावर नवीन आतंकवादी संघटना उदयाला येते. हे थांबवायचे असेल, तर पाकिस्तानला धडा शिकवण्यासह भारतातील धर्मांधांना समजेल अशा भाषेत अद्दल घडवणे आवश्यक ! |

न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा