महाशिवरात्रीच्या दिवशीच संतापजनक घटना

मंगळुरू (कर्नाटक) – देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह असतांनाच गदग जिल्ह्यातील मुंडरगी तालुक्यातील शिंगटालूरु येथील रामलिंगेश्वर मंदिरात शिवलिंग आणि नंदीची मूर्ती यांची तोडफोड करण्यात आली. विशेष म्हणजे महाशिवरात्रीनिमित्त आदल्या दिवशीच ग्रामस्थांनी मंदिराची स्वच्छता करून रंगरंगोटी आणि सजावट केली होती. सकाळी जेव्हा भक्त पूजेसाठी मंदिरात पोचले, तेव्हा मूर्तींची विटंबना झाल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. या कृत्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून दोषींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Vandalism in Gadag, Karnataka! 😡
On #Mahashivratri, miscreants broke into the Ramlingeshwar Temple in Mundargi and desecrated the Shiva Lingam and Nandi idol.
This isn't just a crime; it’s a deliberate attack on Hindu sentiments in our own land. How does anyone have the… pic.twitter.com/t7StpdYobf
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 16, 2026
अज्ञातांनी रात्रीच्या अंधारात मंदिरात प्रवेश करून श्री रामलिंगेश्वर शिवलिंग आणि नंदीची मूर्ती फोडली. तसेच मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या श्री होन्नम्मादेवीच्या मूर्तीचीही हानी केली.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावण्यासाठीच महाशिवरात्रीच्या दिवशीच असे कृत्य करण्यात आले आहे. हिंदूंच्या देशात अशा प्रकारची घटना घडण्याचे कुणाला धाडस होणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे ! |
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण