
एका चांगल्या गोष्टीचे निर्माण होत असतांना त्या निर्माणाबरोबरच वाईट गोष्टींचीही निर्मिती आपोआप होत असते, हा सृष्टीचा नियम आहे. ज्या वेळी समुद्रमंथन केले, तेव्हा हालाहल बाहेर आले आणि एकाच वेळी भगवान शंकराला ते प्राशन करावे लागले. प्रत्येक कलियुगाच्या अंतसमयी शिवाकडून तांडव नृत्य करून ज्या हालाहलाचे रूपांतर नवरसात केले जाते, ते हालाहल आणि समुद्रमंथनातील हालाहल यात काहीच फरक नाही; कारण पृथ्वीवर प्रतिदिन अनंत गोष्टी निर्माण होत असतात. क्षणोक्षणी तयार होणारे हालाहल भगवान शिव त्याच्या साधनेने त्याच्याकडे खेचून घेत असल्याने त्याचे प्रमाण आपल्या लक्षात येत नाही. ज्या वेळी तो तांडव नृत्य करतो त्या वेळी त्या हालाहलाचा साठाही तितकाच प्रचंड असतो. समस्त पृथ्वीच्या रक्षणासाठी हालाहल पिण्याचे समष्टी कार्य केवळ महादेवच करू शकतो. ब्रह्मांडातील सर्व पृथ्वींच्या निर्मितीसमवेत निर्माण झालेले हालाहल भगवान शंकरालाच प्यावे लागते. भगवान शंकर ब्रह्मांडातील हालाहल नित्य स्वत:मध्ये सामावून घेत असल्याने युगानुयुगे ब्रह्मांडातील शुद्ध आणि अशुद्ध याचा तोल राखला जातो.
– ब्रह्मतत्त्व (सनातनचा ग्रंथ ‘शिव’)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !