
आज महाशिवरात्र ! हिंदूंचे आराध्य भोलेनाथांच्या उपासनेचा दिवस ! ‘भक्तांवर त्वरित कृपा करणारी देवता’, अशी या सांबशिवाची ख्याती त्रिभुवनात आहे. त्यामुळे संपूर्ण सृष्टीमध्ये भगवान शिवाची उपासना सर्वाधिक होते. देशाच्या कानाकोपर्यात आज महाशिवरात्रीनिमित्त शिवोपासना होईल. भारतभरातील भगवान शिवाच्या मंदिरांमध्ये शिवपिंडीवर जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक होईल. मंदिराच्या बाहेर रांगेत घंटोन्घंटे उभे राहूनही कोट्यवधी हिंदु भाविक अत्यंत भक्तीभावाने आणि श्रद्धेने भगवान शिवाचे दर्शन घेतील. कोट्यवधी हिंदु बांधव उपवास करून भजन-कीर्तन आदी शिवोपासना करतील. सुवासिनीच्या अंगावरील अनेक अलंकारांमध्ये मंगळसूत्र जसे सौभाग्याचे प्रतीक म्हणून सर्वाधिक मूल्यवान, तसेच या विविध धार्मिक उपासना, म्हणजे हिंदु संस्कृतीचा सौभाग्यालंकारच आहे. धर्माच्या सचेतनेचे हे प्रतीक आहे. समाज वैज्ञानिकदृष्ट्या कितीही प्रगत झाला, आधुनिकतेचा कितीही अंगीकार केला, तरी त्या अचेतनाची चेतना अध्यात्मातच दाखवणारे हे सण-उत्सव आहेत आणि भारतभूमीचा तर आत्माच अध्यात्म हा आहे. जगात भारताची ओळख अन्य कशामुळे नव्हे, तर अध्यात्मामुळेच आहे. धार्मिक परंपरा, सण यांना विरोध करण्यासाठी पुरोगाम्यांनी ‘शिवपिंडीवर दुग्धाभिषेक करू नका’ आदी कितीही कोल्हेकुई केली, तरी ही ईशआराधना थांबणारी नाही. त्या त्या काळानुसार चांगल्यासह अनिष्ट गोष्टी समाजात असतातच. ज्याप्रमाणे असत्यामुळे सत्याचे महत्त्व टिकून रहाते, त्याचप्रमाणे वाईटामुळेच समाजात चांगल्या शक्तीचे श्रेष्ठत्व दृढ रहाते. त्यामुळे सत्य-असत्य, म्हणजे धर्म-अधर्माचा लढा युगानुयुगे चालू आहे. त्यामुळे सद्यःस्थितीतही हा संघर्ष अटळ आहे. सृष्टीचा पालनकर्ताच भगवंत असल्यामुळे धर्माचा विजय हा निश्चित आहेच; मात्र वेळ अशी येते की, जेव्हा अधर्म प्रबळ होतो, स्वत:ला धर्माचे अनुयायी म्हणवणारे अधर्माच्या अधीन होतात, अधर्म बळावतो, अशा स्थितीतही जे धर्माच्या बाजूने, म्हणजेच ईश्वराच्या बाजूने ठाम रहातात, तेच त्याच्या कृपेला पात्र ठरतात. धर्मसंस्थापनाची वेळ प्रत्येक काळात येतच असते आणि याच संधीकालाची वेळ आता आली आहे. या काळात भगवान शिवाची उपासना महत्त्वाची आहे.
हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेऊया !

पूर्वीचे आक्राळविक्राळ राक्षस यज्ञयागाला विरोध करायचे. आताच्या काळात सनातन संस्कृतीला नष्ट करण्यासाठी टपलेल्या या दुष्प्रवृत्तींची रूपे काळानुसार आधुनिक आहेत. अशा वेळी केवळ दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करून केवळ स्वहितासाठी प्रार्थना हा स्वार्थीपणा ठरेल. ३५० वर्षांपूर्वीचा काळ आठवा. ज्या वेळी हिंदु धर्माला नामशेष करायला म्लेंच्छ धर्मांधांच्या तलवारी उठल्या होत्या, तेव्हा छत्रपती शिवरायांनी शिवपिंडीवर रक्ताभिषेक करून हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली होती. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा मूठभर मावळ्यांसह रोहिडेश्वराच्या पिंडीपुढे घेतली होती. या प्रतिज्ञेचे स्वरूप, म्हणजे देहलीच्या तख्ताला हादरा देऊन झालेली हिंदवी स्वराज्याची िनर्मिती होय ! आजही हिंदु धर्माला धर्मांध, साम्यवादी, पुरोगामी, कथित निधर्मी यांनी ग्रासले आहे. हिंदु धर्मावरील ही संकटे दूर करून हिंदु राष्ट्राची पुनर्स्थापना करण्याची प्रतिज्ञा करण्याचा महाशिवरात्री व्यतिरिक्त अन्य शुभसमय कोणता असावा ! छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे शिवपिंडीपुढे हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली, त्याच प्रकारे आज महाशिवरात्रीच्या दिवशी शपथ घेऊन त्याच्या कार्यात योगदान देणे, हीच हिंदूंनी शिव आराधना समजावी. हिंदूंनी ‘शिवोपासना करतांना धर्मरक्षणाकरता कोणते योगदान देणार ?’, याचा संकल्पच करावा.
रुद्रावतार अधर्माच्या नाशासाठी !

भक्त, देवता आणि राक्षस अशा सर्वांना वर प्रदान करणारे भोलेनाथ असा नावलौकिक असला, तरी असुरांचा अत्याचार बळावल्यावर हेच भगवान शिव रुद्रावतार धारण करतात. दक्ष प्रजापतीने सतीचा अपमान केला, तेव्हा स्वत:ची जटा भूमीवर आदळून भगवान शंकरांनी ‘वीरभद्र’ निर्माण केला. या वीरभद्राने शिवनिंदा करणार्या दक्ष राजासह त्याच्या सेनेचाही संहार केला. भोलेनाथाच्या या प्रलयकारी रूपाची साक्ष दुष्प्रवृत्तीला करून देण्याची वेळ आली आहे. ‘लव्ह जिहाद’ करून हिंदु युवतींचे धर्मांतर, आमीष दाखवून हिंदूंचे धर्मांतर, सर्रासपणे चालणारी गोहत्या, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या, हिंदूंच्या सण-उत्सवांवर आक्रमणे, हिंदूंच्या श्रद्धास्थांनाचा अवमान, सनातन हिंदु धर्माला आतंकवादी ठरवण्यासाठी केलेली कूटनीती अशी अनेक औरंगजेबी संकटे आज हिंदु धर्मावर घोंघावत आहेत. त्यांचा सामना करण्यास बळ प्रदान करण्यासाठी िहंदूंनी भगवान शिवाकडे प्रार्थना करावी.
हालाहल प्राशन करावेच लागेल !
समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शिवाने हालाहल प्राशन केले, त्यामुळे अमृत प्राप्त झाले. त्यामुळे हिंदु धर्माला नष्ट करणार्या विषवल्लीचा सामना करण्यासाठीही हिंदूंनी सिद्ध रहावे. आपण आज शिवाची आराधना करत आहोत; कारण आपण अद्यापही हिंदु आहोत. जर हिंदु धर्मच राहिला नाही, तर कुठली आली उपासना आणि कुठले आले धर्माचरण ? ‘हिंदु धर्म म्हणजे मलेरिया, डेंग्यू आहे’, असे मानणारे निधर्मीवादी आणि दुसर्या बाजूला भारताचे इस्लामीस्तान करण्यासाठी टपलेले धर्मांध हे सर्व जण हिंदु धर्माला नष्ट करण्यासाठीच कार्यरत आहेत. पाकिस्तान, बांगलादेश येथील हिंदूंची मंदिरे तोडण्यात आली. तेथे हिंदूंना रहाण्यासाठी स्वत:ची हिंदु ही ओळख झाकावी लागते. तीच वेळ देशात बंगाल, केरळ या राज्यांत काही प्रमाणात दिसून येते. देशातील अनेक मुसलमानबहुल भागात महाशिवरात्री, गणेशोत्सव, दिवाळी हे उत्सव साजरे करता येत नाहीत. उत्सव साजरे केलेच, तर हिंदूंच्या हत्या होतात, मिरवणुकांवर दगडफेक होते. याचा अर्थ असा की, धार्मिक उपासना, सण-उत्सव जोपर्यंत आपण हिंदूबहुल आहोत, तोपर्यंतच रहातील, हे हिंदूंनी ध्यानात घ्यावे. भारतातील ज्या भागात हिंदू अल्पसंख्यांक आहेत, त्या ठिकाणी सण-उत्सव साजरे करायला हिंदूंना मर्यादा आहेत. ज्याप्रमाणे काश्मीरमधून हिंदू परागंदा झाले, त्याप्रमाणे भारतात असे अनेक छोटे पाकिस्तान निर्माण होत आहेत की, तेथे एखाद दुसरे हिंदु कुटुंब राहूच शकत नाही. आज देशातील काही भागांमध्ये दिसणारे हे चित्र भविष्यात संपूर्ण भारताचे होऊ नये, यासाठी हिंदूंनी वेळीच जागृत व्हावे. त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त केवळ स्वत:सह कुटुंबियांच्या कल्याणासाठी नव्हे, तर राष्ट्र-धर्म यांच्या रक्षणासासाठी हिंदूंनी शिवोपासना करावी आणि अधर्माच्या नाशासाठी रुद्रावतार धारण करणार्या भगवान शिवाच्या धर्मरक्षणाच्या कार्याचे हिंदूंनी अनुकरण करावे. त्यामुळे हिंदूंनी आज केवळ धार्मिक विधी म्हणून नव्हे, तर हिंदु राष्ट्र स्थापनेचा दुग्धाभिषेक म्हणून शिवोपासना करावी !
संपादकीय : स्टार्मर यांचे काय चुकले ?
संपादकीय : ‘तेज’स कि मागास ?
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची स्थगिती !
श्री चांगदेव महाराजांच्या मंदिरात धर्मांधांकडून अतिक्रमण !
संपादकीय : बांगलादेशी हिंदूंचे ‘जय श्रीराम’ !
संपादकीय : तीर्थक्षेत्रांच्या दु:स्थितीचे मूळ !