जगात सर्वांत मोठी हानी ही धर्मयुद्धांमुळे झालेली आहे. आपला धर्म दुसर्यावर लादण्यासाठी सत्ता, संपत्ती, अनन्वित छळ, गरिबी आणि अज्ञान याचा अपलाभ इत्यादींचा जगभरात मुक्तपणे वापर झाला आहे; पण हिंदु धर्म मात्र युद्धाने कुणावर लादला गेला नाही; तरीही भारतीय उपखंडामध्ये तो सहस्रो वर्षे टिकून आहे. प्राचीन काळी सनातन भारतीय संस्कृतीचे संपूर्ण पृथ्वीवर अधिराज्य होते, असे इतिहास सांगतो. याचीच काही उदाहरणे म्हणजे विविध देशांमध्ये आजही सनातन संस्कृतीतील विविध देवतांचे पूजन केले जाते !
गयाना

या देशाच्या टपाल तिकिटावरील शंकर हा पूर्ण निळ्या रंगाचा आहे. त्याला नीलकंठ म्हणण्याऐवजी नीलवर्ण म्हणणे योग्य ठरेल.
पूर्वी साम्यवादी असणार्या ‘झेक रिपब्लिक’च्या टपाल तिकिटावर शिवाचा परिवार !

‘झेक रिपब्लिक’ हा देश धर्मच न मानणार्या साम्यवादी विचाराखाली ५० वर्षे इतक्या प्रदीर्घ काळ राहिला होता. तरीही स्वतंत्र झाल्यावर त्यांना त्यांच्याच ‘नेप्रतस्कोवो’ वस्तूसंग्रहालयामधील हिंदु धर्मातील शिवपरिवाराच्या सुंदर चित्राची आठवण झाली आणि त्यांनी त्यावर २१ फेब्रुवारी २००७ या दिवशी शिवाचा परिवार असलेले एक टपाल तिकीट काढले. याच्या प्रथम दिवस आवरणावरही शिव-पार्वतीचे रेखाचित्र आहे. यातील पार्वतीच्या कपाळावर मराठी पद्धतीची कुंकवाची चिरी दिसते. वस्त्रांवरील नक्षी आणि रंग हेही पूर्वीच्या मराठी शैलीतील वाटतात. विरूपण (cancellation) शिक्क्यामध्येही गणपतीचे रेखाचित्र वापरले आहे.
थायलंड
याने ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्यावर ३ टपाल तिकिटे काढली असून त्यांतील विष्णु आणि शिव यांची चित्रे बौद्ध शैलीतील आहेत.
नेपाळ
नेपाळ हा देश अनेकदा महाशिवरात्रीला खास टपाल तिकीट प्रसिद्ध करतो.
श्रीराम, गणपति आदी देवता सध्याच्या इस्लामी देशातही पूजल्या जातात. पूर्वी तिथे हिंदु संस्कृतीच होती, याचे ते प्रमाण आहे. विविध देशांनी आजपर्यंत भगवान शिवाचे चित्र असलेली टपाल तिकिटे प्रसिद्ध केली आहेत.
– श्री. मकरंद करंदीकर, ठाणे
(सर्व शिवतिकिटे श्री. मकरंद करंदीकर यांच्या संग्रहालयातील आहेत.)

गुरूंचे माहात्म्य अन् शिष्याची गुरुभक्ती
शिष्याला ईश्वरप्राप्तीकडे गतीमान करणारी गुरुकृपा !
‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !
कल्पनेद्वारे नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये पालटणे !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !