स्वातंत्र्याच्या काळापर्यंत कर्मफल आणि पुनर्जन्म यांविषयीची श्रद्धा टिकून असणे; मात्र स्वातंत्र्यानंतर ती नष्ट होणे !

 

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘प्रत्येक हिंदूच्या अंतर्यामी अशा प्रकारची श्रद्धा आहे, ‘आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला सुख-दुःख प्राप्त होते. आपल्या कर्माची फळे या जन्मात किंवा पुढच्या जन्मात भोगावी लागतात.’ कर्मफलाच्या धारणेमुळेच हिंदु समाज भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी यांपासून सहस्रो वर्षे दूर राहू शकला. स्वातंत्र्याच्या काळापर्यंत ही कर्मफल आणि पुनर्जन्म यांविषयीची श्रद्धा टिकून होती; मात्र स्वातंत्र्यानंतर ती क्षीण होत गेली. जवळजवळ नष्टप्राय झाली.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मे २०१७)