‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?

‘ई-केवायसी’नंतर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा ५ लाख सरकारी कर्मचारी अपलाभ घेत असल्याचे आढळून आले. या सरकारी कर्मचार्‍यांची नावे योजनेतून काढण्यात आली आहेत. या कर्मचार्‍यांनी सरकारची फसवणूक करून जे पैसे लाटले, त्याची वसुली करण्याचे दायित्व संबंधित शासकीय विभागांकडे सोपवण्यात आले आहेत. यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाने या कर्मचार्‍यांची नावे संबंधित विभागांकडे पाठवली आहेत.’ (३.६.२०२६)


‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा अपलाभ घेणार्‍या ५ लाख सरकारी कर्मचार्‍यांना कामावरून काढा ! हे भारताला जगभरात लज्जास्पद !

‘मागील ९ मासांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्‍या लाखो जणांनी अद्यापही ‘ई-केवायसी’ केलेली नाही. निकष पूर्ण करत नसल्यामुळेच ते ‘ई-केवायसी’ करणे टाळत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘ई- केवायसी’ न केलेल्यांचे पैसे रोखले जातील. अपात्र लाभार्थी महिलांकडून दिलेले पैसे पुन्हा वसूल केले जाणार नाहीत; मात्र ज्या १४ सहस्र पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून मात्र पैसे वसूल केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.’ (३.६.२०२६)