
उकाडा चालू झाल्याने सगळ्यांनी आईस्क्रीम, मिल्कशेक, कोल्ड कॉफी वगैरे पदार्थ खायला प्रारंभ केला आहे. आताच्या थंडीनंतर वाढीला लागलेला उन्हाळा हा थंडीत साठलेला कफ बाहेर टाकण्याचे काम करणारा आहे. यामुळे कफाचे त्रास आता पटकन होणार. थंडी ते आता चालू झालेला उकाडा या ऋतूसंधीमध्ये घसा आणि नाक यांना मुख्यतः त्रासापासून जपणे आवश्यक. त्यामुळे अचानक फळे, फळांचे रस, लस्सी, गार ताक आणि वर सांगितलेले पदार्थ चालू करतांना जरा जपूनच करावेत.

यासह ऋतूंमधील पालटांमुळे अंगावर पुरळ, खाज, गांध्या आणि कोरडेपणा यांचेही प्रमाण वाढले आहे. त्यासाठी पोट स्वच्छ ठेवणे, हलके, कोरडे आणि अल्प मसालेदार खाणे, शिळे अन् आंबवलेले टाळणे, नियमित व्यायाम या गोष्टी साहाय्य करतात. पुष्कळ गरम पाण्याने मीठ घालून गुळण्या करण्यापेक्षा कोमट पाणी आणि हळद यांच्या गुळण्या कराव्यात.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (८.२.२०२६)
‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !
कल्पनेद्वारे नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये पालटणे !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
अहंकार कि सत्याचा शोध ?