भारताकडून औषधे आयात करण्याचा प्रयत्न होणार
काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या तालिबानच्या अर्थ मंत्रालयाने पाकिस्तानमधून औषधांची आयात पूर्णपणे बंद करण्याचा आदेश दिला आहे. अफगाणिस्तानच्या अर्थ मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल कयूम नासिर यांनी सांगितले की, ‘ही बंदी लागू झाली आहे.’ सरकारने अफगाणी व्यापार्यांना पाकिस्तानऐवजी इतर पर्यायी व्यापारी मार्ग शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बंदीमुळे पाकिस्तानच्या औषधनिर्मिती उद्योगाला कोट्यवधी रुपयांची हानी होणार असून प्रादेशिक पातळीवरील त्याची कूटनीतिक पकडही दुर्बल होईल. दुसरीकडे भारतासाठी ही परिस्थिती अफगाणिस्तानसमवेत मानवीय आणि व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याची मोठी संधी ठरू शकते.
पाकिस्तानवरील ही बंदी अफगाणिस्तानसाठीही मोठा धोका ठरू शकते; कारण तेथील ७० टक्क्यांहून अधिक औषधे पाकिस्तानमधून येत होती. काबुल आणि हेरात या शहरांमध्ये औषधांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून दर प्रचंड वाढले आहेत. ही कमतरता भरून काढण्यासाठी तालिबानचे अधिकारी मागील महिन्यात भारत, इराण आणि तुर्कीये देशांच्या दौर्यावर गेले होते. पाकिस्तानऐवजी भारतासारख्या विश्वासार्ह देशांकडून औषधनिर्मिती क्षेत्रातील आयात वाढवण्यासाठी तालिबान नवीन मार्ग उघड करण्याचा प्रयत्न करत आहे.

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !