प्रसिद्ध लेखक आणि प्राध्यपक डॉ. आनंद रंगनाथन् यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

नवी देहली – प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत असणारे प्राध्यापक डॉ. आनंद रंगनाथन् यांनी ‘‘भारतीय चलनावर मोहनदास गांधी यांच्याव्यतिरिक्त अन्य थोर विभूतींची छायाचित्र प्रसिद्ध करावीत’, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ‘एक्स’वर माहिती प्रसारित करून केली आहे.
डॉ. रंगनाथन् यांनी म्हटले की,
प्रत्येक राष्ट्राच्या चलनावर त्या देशातील थोर व्यक्तींची छायाचित्रे छापली जातात. ब्रिटनच्या चलनावर डार्विन (जीवशास्त्रज्ञ), ऑस्टन, डिकन्स (लेखक), फॅरडे (भौतिकशास्त्रज्ञ) यांची छायाचित्रे आहेत; मात्र भारताच्या चलनावर केवळ म. गांधी यांचेच छायाचित्र आहे. ही हट्टीपणाची भूमिका समजण्यापलीकडची आहे. भारतातही अनेक थोर विभूती होऊन गेल्या आहेत. आम्हाला या थोर विभूतींची छायाचित्रे चलनावर हवी आहेत. उदा. सी.व्ही. रमण (शास्त्रज्ञ), रामधारी सिंह दिनकर (कवी), रामानुजन् (गणितज्ञ), जगदीशचंद्र बोस (शास्त्रज्ञ), स्वामी विवेकानंद, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (शास्त्रज्ञ).
Indian currency should reflect many great national icons – not just Mahatma Gandhi.
Renowned author & professor Dr. Anand Ranganathan (@ARanganathan72) urges PM Narendra Modi to act.
This isn’t one voice; it’s the sentiment of every patriotic Indian 🇮🇳
#IndianCurrency… pic.twitter.com/KpmHw8HncV
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 9, 2026
संपादकीय भूमिकाकेवळ डॉ. रंगनाथन् यांचीच नव्हे, तर प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतियाची हीच मागणी आहे ! |
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !