२ महिन्यांपूर्वी १६ भारतीय नाविकांना अटक केल्यावरून भारताचे प्रत्युत्तर ?

नवी देहली – भारत आणि इराण यांच्यात अनेक दशके चांगले संबंध राहिले आहेत; मात्र गेल्या एका महिन्यात काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. मागील वर्षी ८ डिसेंबरला ‘व्हॅलेंट रोर’ या तेल टँकर नौकेचा इराणच्या नौदलाकडून पाठलाग करण्यात आला होता आणि त्यावरील १६ भारतीय नाविकांना अटक करण्यात आली. आता भारतीय तटरक्षक दलाने २ दिवसांपूर्वी अरबी समुद्रात इराणशी संबंधित ३ नौका एकामागोमाग पकडल्या आहेत.
India strikes back! 🇮🇳⚓
In a major move following the arrest of 16 Indian sailors two months ago, the Indian Coast Guard has seized 3 Iranian oil tankers. 🚢🚫
A strong message on maritime security and protecting our citizens. ⚖️💪#IndianCoastGuard #MaritimeSecurity… pic.twitter.com/AhWacp0saH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 9, 2026
या नौका मुंबईच्या बंदरात आणण्यात आल्या आहेत. इराणच्या नौदलाच्या कारवाईनंतर जवळपास २ महिने उलटूनही सर्व भारतियांची सुटका न झाल्याने, भारताने तेल टँकर नौका जप्त करून इराणला प्रत्युत्तर दिले आहे का ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
On 06 Feb 26, @IndiaCoastGuard busted an International oil-smuggling racket in a meticulously coordinated sea–air operation. The syndicate exploited mid-sea transfers in international waters to move cheap oil from conflict ridden regions to motor tankers, evading duties owed to… pic.twitter.com/erJ31U4xyH
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) February 7, 2026
१. तटरक्षक दलाच्या निवेदनानुसार ही कारवाई मोठ्या सागरी तस्करीशी संबंधित असून या नौका आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीर तेल तस्करी करत होती. ‘एएल् जाफझिया’, ‘ॲस्फाल्ट स्टार’ आणि ‘स्टेलर रुबी’ अशी या नौकांची नावे असल्याचे म्हटले जात आहे. या तिन्ही नौकांवर अमेरिकेने निर्बंध घातले होते.
२. जप्त केलेल्या ३ तेल टँकरवरील क्रू सदस्यांची अचूक संख्या अद्याप घोषित केलेली नाही; मात्र अंदाजानुसार एका तेल टँकरवर साधारणपणे १५ ते २५ क्रू सदस्य असतात. त्या हिशोबाने तिन्ही नौकांवर मिळून ४६ ते ७५ क्रू सदस्य (कर्मचारी आणि अधिकारी) असण्याची शक्यता आहे. त्यांपैकी किती इराणी, किती भारतीय किंवा इतर देशांतील आहेत, याची माहिती सध्या उपलब्ध नाही. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे या नौकांवरील बहुतांश क्रू इराणी नागरिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत