
मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा’, अशी मागणी होत आहे. सध्या केंद्रात भाजपची सत्ता असूनही सावरकर यांना अजूनही भारतरत्न पुरस्कार का मिळाला नाही ?’, या प्रश्नाला उत्तर देतांना प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले, ‘‘सावरकर लाखो, कोट्यवधी हृदयांचे सम्राट बनले आहेत. त्या (संबंधित) समितीत मी नाही, जर त्या समितीमधील कुणी मला भेटले, तर त्यांना मी नक्की विचारीन.’’ वरळी डोम येथे चालू असलेल्या २ दिवसांच्या कार्यक्रमात दुसर्या दिवशी अनेकांनी त्यांना यावरून प्रश्न विचारले. त्या वेळी ते बोलत होते.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही ! – प.पू. सरसंघचालक
‘भाजपची सत्ता आल्याने संघाला चांगले दिवस आले आहेत का ?’, असा प्रश्नही या वेळी प.पू. सरसंघचालकांना विचारण्यात आला. ‘भाजप सत्तेत आल्यामुळे आमचे चांगले दिवस आले, असे नाही. त्याच्या उलट आहे. आमची शक्ती आहे. लोक आमचे ऐकतात, त्याचा लाभ त्यांना (भाजपला) होतो. आमचे काम वाढले आहे. त्यांनी (भाजपने) आमची साथ दिली म्हणून त्यांना चांगले दिवस आले. आम्ही भाजपवर कोणताही दबाव आणला नाही. आमच्या संघाच्या शाखेत कोणतेही राजकारण होत नाही’, असे या वेळी प.पू. सरसंघचालक म्हणाले.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !