‘एपस्टीन फाइल्स’ : भांडवलशाहीचे नव्हे, तर ‘वोकिझम’चे अपत्य…!

(टीप : ‘वोकिझम’, म्हणजे जगभरात प्रस्थापित समाजव्यवस्था, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांना छेद देणारी विकृती !)

जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील ‘सीरियल रेपिस्ट’ (अनेक बलात्कार करणारा) आणि ‘चाईल्ड मॉलेस्टर’ (मुलांवर लैंगिक अत्याचार करणारा) होता. वर्ष १९९८ मध्ये त्याने ‘युनायटेड स्टेट्स व्हर्जिन आयलँड्स’ या बेटांच्या समूहातील ‘लिटल सेंट जेम्स’ हे एक छोटे बेट विकत घेतले, जे आता ‘एपस्टीन आयलँड’ म्हणून ओळखले जाते. 

या बेटावर त्याने त्याच्या लैंगिक विकृतींचे एक मोठे केंद्र उभे केले, जिथे लहान मुलामुलींचे लैंगिक शोषण करण्यासाठी संपूर्ण जगावर प्रभुत्व गाजवणारे उच्चभ्रू (एलीट) लोक वारंवार भेटी देऊ लागले. या भेटींच्या वेळी काढलेली छायाचित्रे, व्हिडिओ हे एपस्टीनने जगभरातील अनेक उच्चभ्रू लोकांना पाठवलेल्या ‘ई-मेल्स’ अशा ६० लाखांहून अधिक गोष्टींचा साठा, म्हणजे ‘एपस्टीन फाइल्स (धारिका)’ !

१. उच्चभ्रू लोकांच्या विकृतीचा भेसूर चेहरा 

१८ नोव्हेंबर २०२५ या दिवशी अमेरिकेच्या ‘हाऊस ऑफ रिप्रेसेंटेटिव्हज्’ने (लोकप्रतिनिधी सभागृह) ‘एपस्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट’ हा कायदा संमत केला, ज्याला सिनेटने एकमताने मान्यता दिली. या कायद्यानुसार या ‘फाइल्स’मधील माहिती टप्प्याटप्प्याने घोषित करण्यात येत आहे. त्यासह आधुनिक मानवी समाजाच्या सर्वोच्च शिखरावरील अतीश्रीमंत, सर्वशक्तीमान, ‘एलीट’ लोकांची रसातळाला गेलेली नीतीमत्ता आणि त्यांच्या विकृतीचा भेसूर चेहरा उघडा पडू लागला आहे अन् त्याच्या बघण्याने जग हादरून गेले आहे.

२. फ्रँकफर्ट स्कूलच्या सदस्यांनी सांस्कृतिकता नष्ट करण्यासाठी रचलेले षड्यंत्र

हे साध्य करण्यासाठी त्यांनी निवडलेला एक मार्ग होता अनिर्बंध लैंगिकतेचा प्रसार. आपल्या विकृत कल्पनांना सिद्धांताचे स्वरूप देणे, हे साम्यवाद्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यानुसार फ्रँकफर्ट स्कूलचा एक सदस्य हर्बर्ट मार्क्यूज याने ‘इरॉस अँड सिव्हिलायझेशन’  नामक ग्रंथ लिहिला. मार्क्यूजच्या मते भांडवलशाहीतील तर्कशुद्धतेपासून मुक्ती (technological rationality) मिळवण्याचा एकमेव मार्ग, म्हणजे आपल्या कामुकतेला आणि वैषयिकतेला (Erotic side and sensual instincts) मुक्त सोडणे. याचा सोप्या शब्दातील अर्थ, म्हणजे लैंगिक वासनांना कुठलीही आडकाठी न घालता मोकळे सोडणे. हर्बर्ट मार्क्युज म्हणतो, ‘मानवाची मुक्ती ही कामुकतेला बंधमुक्त करण्यातच आहे.’

फ्रँकफर्ट स्कूलचा आणखी एक सदस्य जॉर्जी लुकाक्स हा हंगेरीत काही काळ शिक्षण आणि संस्कृती या खात्यांचा प्रमुख होता. तेव्हा त्याने ‘कल्चरल टेररिझम’ (सांस्कृतिक आतंकवाद) हा कार्यक्रम राबवला होता. यामध्ये मुलांना मध्यमवर्गाची जुनाट नीतीमूल्ये, मुक्त लैंगिक संबंधांमधील बारकावे यांसारख्या गोष्टींचे शिक्षण दिले जाऊ लागले.

‘एपस्टीन फाइल्स’, म्हणजे ‘वोकिझम’चे विषारी फळ !

श्री. अभिजित जोग

शोकांतिकेतही स्वतःच्या विचारसरणीचा प्रसार करण्याची संधी शोधणार्‍या साम्यवाद्यांनी ‘एपस्टीन फाइल्स’ हे भांडवलशाहीचे अपत्य आहे आणि आता जगाला साम्यवादी विचारांकडे वळण्याविना पर्याय नाही’, असा प्रचार चालू केला आहे. यातील श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांचा सहभाग बघता बहुसंख्य लोक या प्रचाराला भुलतील, अशी  शक्यता पुष्कळच आहे. म्हणूनच यामागचे वास्तव काय आहे, हे समजून घेणे आवश्यक ठरते. 

‘एपस्टीन फाइल्स’मधून उघड होणारे अधःपतन आणि विकृती हे भांडवलशाहीचे अपत्य नाही, तर ‘वोकिझम’च्या विषवल्लीला आलेले विषारी फळ आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिका आणि पश्चिम युरोप यांच्यामध्ये समृद्धी अन् प्रगती यांचा कालखंड चालू झाला. या वेळेपर्यंत मार्क्सवादी क्रांती अयशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले होते. आपल्या विचारांचा दारूण पराभव आणि ज्या विचारांचा आपण कायम द्वेष केला, त्यांचा विजय मार्क्सवाद्यांना सहन झाला नाही. यासाठी त्यांनी पाश्चात्त्य सभ्यतेच्या विनाशाची योजना बनवली, जिला ‘सांस्कृतिक मार्क्सवाद’ किंवा आताच्या भाषेत ‘वोकिझम’ या नावाने ओळखले जाते. या योजनेचे प्रवर्तक असलेल्या ‘फ्रँकफर्ट स्कूल’ या साम्यवादी प्राध्यापकांच्या गटाने ‘क्रिटिकल थिअरी’ (गंभीर सिद्धांत) हा सिद्धांत मांडला, ज्याचे उद्दिष्ट होते पाश्चात्त्य संस्कृतीला बळ देणार्‍या कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था आणि देशप्रेम या संस्थांना आतून पोखरून नष्ट करणे. फ्रँकफर्ट स्कूलचा एक सदस्य विली मंझेनबर्ग याने घोषित केले होते, ‘We will make the Western Civilization stink.’ (आपण पाश्चात्त्य संस्कृतीला दुर्गंधीयुक्त करू.)


– श्री. अभिजित जोग

३. ‘लैंगिक विकृतीही बंधमुक्त असाव्यात’, हा ‘वोकिझम’चा आग्रह !

‘वोकिझम’मध्ये ‘समलैंगिकता प्लस’ (LGBTQ+) आणि त्यासारख्या गटांना दिलेले महत्त्व हे ‘लैंगिकतेवर कुठलीही बंधने नकोत’, या विचाराचाच आविष्कार आहे. समलैंगिकतेमधील ‘लेस्बियन’ (समलिंगी), ‘गे’ (समलिंगी पुरुष), ‘बायसेक्शुअल’ (उभयलिंगी), ‘ट्रान्सजेंडर’ (तृतीयपंथी), ‘क्वीअर’ (असामान्य) हे प्रकार आता बहुतेकांना ठाऊक झाले आहेत; पण नंतर येणारा ‘प्लस’ म्हणजे काय हे अनेकांना ठाऊक नसते. ‘प्लस’, म्हणजे ‘पेडोफिलिया’ (अल्पवयीन मुलामुलींशी संबंध) ‘बेस्टिआलिटी’ (जनावरांशी संबंध) इत्यादी विकृतीही बंधमुक्त असाव्यात, हा ‘वोकिझम’चा आग्रह. अशा प्रकारे एपस्टीन आयलँडवर अल्पवयीन मुलामुलींचे लैंगिक शोषण करण्यासाठी होणारी उच्चभ्रूंची गर्दी हे वोकिझमचेच अपत्य आहे. विली मंझेनबर्गच्या म्हणण्याप्रमाणे ‘पाश्चात्त्य संस्कृतीची खरीच दुर्गंधी येऊ लागली आहे.’

४. ‘वोक’ अफूच्या नशेतच जगातील उच्चभ्रू लोकांनी अनिर्बंध लैंगिकतेची कल्पना अंगिकारली !

भांडवलशाहीच्या शिखरावर असलेल्या अतीश्रीमंतांवर ‘वोकिझम’चा प्रभाव कसा, हा प्रश्न पडला असेल, तर हे लक्षात घेतले पाहिजे की, समाजाला विभाजित करण्याचा गरीब विरुद्ध श्रीमंत हा आर्थिक संघर्षबिंदू साम्यवाद्यांनी कधीच सोडून दिला आहे. साम्यवादी विचार हा आता गरिबांचा नव्हे, तर उच्चभ्रूंचा कैवारी ठरला आहे. साम्यवादी म्हणत असत, ‘Religion is the opium of the masses.’ (धर्म ही अफूची गोळी आहे.) तसे आता म्हणावे लागेल, ‘Wokism is the opium of the elite’ (‘वोकिझम’ हा उच्चभ्रू लोकांचा अफू आहे.), या ‘वोक’ अफूच्या नशेतच जगातील उच्चभ्रू लोकांनी अनिर्बंध लैंगिकतेची कल्पना अंगिकारली आहे, हेच एपस्टीन बेटावर दिसून आले.

संस्कृतीचा विनाश हे ‘वोकिझम’चे उद्दिष्ट आहे. हे साध्य करण्यासाठी नैतिक मूल्यांचा र्‍हास घडवून आणण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे. यासाठी ‘काय नैतिक आणि काय अनैतिक’, हे ठरवण्याचे वस्तूनिष्ठ निकषच नसतात, हा ‘मॉरल रिलेटिव्हिझम’चा (सापेक्ष नैतिकतावाद) सिद्धांत मांडून त्यांनी नैतिकतेला मागासलेले अन् अनैतिकतेला ‘कूल’ (स्थिरचित्त) ठरवले आहे. एपस्टीन आयलँडवर घडलेले अपप्रकार, हा या ‘वोक’ विचारांचाच भेसूर आविष्कार होता.

पाश्चात्त्य संस्कृतीला विनाशाच्या टोकावर आणून उभे केल्यानंतर आता ‘वोक लिबरल्स’ची (उदारमतवाद्यांची) दृष्टी भारताकडे वळली आहे. म्हणूनच जगात काय घडते आहे, हे आपण नीट समजून घेऊन सावध रहायला हवे.

– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (६.२.२०२६)

संपादकीय भूमिका

नैतिक मूल्योंचा ऱ्हास घडवून आणून संस्कृतीचा विनाश करणे, हेच ‘वोकिझम’ चे उद्दिष्ट आहे, हे जाणा !