(हिजाब म्हणजे डोके आणि मान झाकण्यासाठी मुसलमान महिला वापरत असलेले वस्त्र)

न्यूयॉर्क (अमेरिका) – शहराचे महापौर जोहरान ममदानी यांच्या कार्यालयाने १ फेब्रुवारी या दिवशी जगभरात साजर्या होणार्या ‘जागतिक हिजाब दिना’च्या निमित्ताने हिजाबचे उदात्तीकरण करणारे विचार सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले होते.
February 1st is #WorldHijabDay! Today, we celebrate the faith, identity, & pride of Muslim women & girls around the word who choose to wear the hijab, a powerful symbol of devotion & celebration of Muslim heritage. pic.twitter.com/66YMVosNfT
— NYC Mayor’s Office of Immigrant Affairs (@NYCImmigrants) February 2, 2026
त्यामुळे मानवाधिकार कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेऊन ममदानी यांच्यावर टीका केली आहे. ममदानी यांच्या कार्यालयाने ‘एक्स’वर प्रसारित केलेल्या लिखाणात म्हटले, ‘हिजाब हे भक्ती आणि मुसलमान वारसा यांचे शक्तीशाली प्रतीक आहे. जगभरातील मुसलमान महिला आणि तरुणी हिजाब परिधान करण्याचा पर्याय निवडतात. त्यांची श्रद्धा, ओळख आणि अभिमान यांचा उत्सव साजरा करण्याचा ‘जागतिक हिजाब दिन’ हा दिवस आहे.’

१. इराणी वंशाच्या अमेरिकी पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्या मसीह अलीनेजाद यांनी महापौरांना थेट संबोधित करत म्हटले, ‘न्यूयॉर्कसारख्या शहरात रहात असतांनाही महापौरांनी अशी माहिती प्रसारित केल्यामुळे मला मानसिक त्रास होत आहे. इराणमधील महिलांवर लागू असलेल्या सक्तीच्या हिजाब कायद्यांकडे आणि तेथे होत असलेल्या दडपशाहीकडे ममदानी यांच्या कार्यालयाने प्रसारित केलेल्या विचारांमुळे दुर्लक्ष होते.’
NYC Mayor Zohran Mamdani is facing a massive backlash for glorifying the Hijab. 🚨
As women globally risk their lives to protest forced veiling, Mamdani, the city's first Muslim mayor and a self-titled 'Communist' is being called out for romanticizing the garment.
Critics say… pic.twitter.com/5DzRdr5xul
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 6, 2026
२. इराणमध्ये हिजाब घालण्यास नकार दिल्याने महिलांना अटक केली जात आहे, मारहाण केली जात आहे आणि अनेक प्रकरणांमध्ये त्यांचा जीवही गेला आहे. अशा वातावरणात हिजाबला अभिमान आणि उत्सवाचे प्रतीक म्हणून सादर करणे असंवेदनशील आहे, अशी काहींनी टीका केली आहे.
३. तुर्कीये वंशाचे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक तैमूर कुरान यांनी सांगितले की, इराण, तुर्कीये अन् सौदी अरेबिया यांसारख्या देशांमध्ये लाखो मुसलमान हिजाबला अभिमानाचे नाही, तर छळाचे प्रतीक मानतात.
संपादकीय भूमिकाममदानी हे स्वतःला ‘साम्यवादी’ म्हणवून घेतात. दुसरीकडे जगभरात हिजाबविरोधी आंदोलने चालू असतांना त्याला पाठिंबा देण्याऐवजी ममदानी हिजाबचे उदात्तीकरण करतात. यातून साम्यवाद्यांचा मुसलमानधार्जिणेपणा दिसून येतो. ममदानी यांच्यासारखे साम्यवादी आणि त्याहून अधिक धार्मिक कट्टरतावादी हे जगासाठी त्यामुळे धोकादायक आहेत ! |
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !