परिसरातील सरोवराला मुसलमानही भेट देत असल्याने हिंदूंकडून संताप व्यक्त
येणार्या मुसलमानांना गोमूत्राने स्नान अनिवार्य करण्याची चेतावणी
सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथील ‘श्री गोगा मढी’ या हिंदूंच्या धार्मिक स्थळाला मनोरंजनाचे स्थळ म्हणून रूपांतरित केल्यावरून हिंदूंनी विरोध केला आहे. येथील गोगा मढी संकुलात असलेल्या ‘गोरक्ष गंगा सरोवर’ला ‘फन पॉईंट’ (मौजमजा करण्याचे ठिकाण) जात असल्याचा आरोप करत हिंदु संघटनांनी आंदोलन चालू केले आहे. हिंदूंच्या या तीर्थक्षेत्री मुसलमानांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने येथील धार्मिकतेवर नकारात्मक परिणाम होत असल्याचा आरोप ‘गोगा मढी सुधार सभे’चे अध्यक्ष अनिल प्रताप सैनी यांनी केला आहे.
🕉️ Sacred Site Under Threat? Anger Erupts at Shri Goga Madhi 🚨
Saharanpur (Uttar Pradesh): Hindu organisations have opposed the conversion of the revered Shri Goga Madhi pilgrimage site into a recreational "fun point."
Devotees allege that the religious sanctity of the… pic.twitter.com/hYP7IiStYs
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 13, 2026
यावर अद्याप प्रशासनाकडून कोणतीच भूमिका घेण्यात आलेली नाही. यासंदर्भात ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने सहारनपूरचे जिल्हाधिकारी अरविंद कुमार चौहान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही.
हिंदुत्वनिष्ठांकडून शुद्धीकरण विधी !
मुसलमानांच्या या परिसरातील प्रवेशानंतर तेथे स्थापित असलेल्या ‘जाहरवीर गोगाजी महाराज’ यांच्या मूर्तीचे शुद्धीकरण आणि पूजाविधी करण्यात आले. यासंदर्भात अनिल प्रताप सैनी म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या वर्षी येथे ‘गोरक्ष गंगा सरोवरा’चे उद्घाटन केले. हे स्थळ लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. आमच्या समितीशी कोणतीही चर्चा न करता या सरोवराचे स्वरूप पालटण्यात आले असून आता ते एखाद्या धार्मिक स्थळाऐवजी मौजमजेचे केंद्र वाटत आहे. यास येथील महानगरपालिका प्रशासन उत्तरदायी आहे.
दोन्ही प्रवेशद्वारांवर ‘गोमूत्र प्रकल्प’ उभारणार !
सैनी यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, या धार्मिक स्थळावरील प्रवेश केवळ सनातन धर्माच्या अनुयायांपुरताच मर्यादित ठेवण्यात यावा. त्यांच्या मागण्यांवर त्वरित कार्यवाही न झाल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल. या धार्मिक स्थळाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर ‘गोमूत्र प्रकल्प’ उभारण्याची सिद्धता चालू करण्यात आली आहे. या प्रवेशद्वारांतून आत येणार्या कोणत्याही मुसलमान व्यक्तीला गोमूत्राने स्नान करणे अनिवार्य असेल. या मोहिमेसाठी आम्ही गावागावांत संपर्क करणार आहोत. आवश्यकता भासल्यास आम्ही स्वतःला अटक करून घेण्याची सिद्धताही ठेवू.

महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !