राज्यपालांकडून वटहुकूमावर स्वाक्षरी; आता पणनमंत्र्यांच्या अधिपत्याखाली होणार कारभार !

सांगली – सांगलीसह राज्यातील १२ प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांना आता ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यपालांनी या संदर्भातील वटहुकूमावर स्वाक्षरी केली आहे. या क्रांतीकारक निर्णयामुळे स्थानिक राजकीय नेत्यांच्या स्वार्थी राजकारणाला आणि मनमानी कारभाराला अटकाव बसणार आहे.
पहिल्या टप्प्यात सांगली, मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर यांसह १२ बाजार समित्यांचा यामध्ये समावेश आहे. नव्या रचनेनुसार अध्यक्षपदी थेट राज्याचे पणनमंत्री असतील, तर उपाध्यक्षपदी पणन राज्यमंत्री असतील. १६ सदस्यांच्या नव्या मंडळात कृषी आयुक्त, पणन संचालक यांच्यासह ५ शेतकरी प्रतिनिधी, ३ व्यापारी प्रतिनिधी आणि इतर राज्यांचे प्रतिनिधी अन् आयात-निर्यात क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असेल.
‘राष्ट्रीय बाजार’ दर्जासाठीचे निकष
बाजार समितीला हा दर्जा मिळण्यासाठी वार्षिक शेतमाल आवक ८ लाख ३ सहस्र मेट्रिक टनांहून अधिक असणे आणि देशातील किमान २ किंवा त्याहून अधिक राज्यांतून तेथे शेतमालाची आवक होणे बंधनकारक आहे.
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !