तेलंगाणा उच्च न्यायालयाने महिलेचा घटस्फोटाचा अर्ज स्वीकारतांना नोंदवले निरीक्षण
भाग्यनगर (तेलंगाणा) – राज्यातील एका घटस्फोटाच्या प्रकरणात तेलंगाणा उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले की, पतीने वयासंदर्भात चुकीची माहिती दिल्यामुळे पत्नीने वयातील सुसंगतता आणि ज्योतिषशास्त्रीय जुळवणी यांविषयीच्या चुकीच्या समजुतीतून विवाहास संमती दिली होती. ही फसवणूक आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने संबंधित महिलेचा घटस्फोटाचा अर्ज स्वीकारला. पतीकडून चुकीचा जन्मदिनांक सांगितल्यामुळे जन्मकुंडली जुळवण्यात चूक झाली होती, असा दावा या महिलेने केला होता.
🚨 Fake Horoscope, Real Betrayal: Telangana High Court Calls It Cheating
📌 Providing a false date of birth that results in an incorrect horoscope match amounts to cheating the wife, observed the Telangana HC while admitting a woman's divorce petition.
Marriage is founded on… pic.twitter.com/G80IuXUt1e
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 14, 2026
१. न्यायमूर्ती के. लक्ष्मण आणि न्यायमूर्ती बी.आर्. मधुसूदन राव यांच्या खंडपिठाने ‘हिंदु विवाह कायदा, १९५५’च्या कलम १२(१)(क) अंतर्गत पत्नीची याचिका फेटाळणारा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रहित केला.
२. या जोडप्याचे लग्न वर्ष २०१८ मध्ये झाले होते. पतीचा खरा जन्मदिनांक ९ फेब्रुवारी १९७४ असतांना त्याने तो ९ फेब्रुवारी १९८१ असल्याचे खोटे सांगितले होते. हे पत्नीला नंतर समजल्याचे तिने म्हटले.
३. घटस्फोटाचा आदेश देतांना उच्च न्यायालयाने नमूद केले की, कायमस्वरूपी पोटगी, सोन्याचे दागिने परत करणे आणि तडजोड यांसारख्या सूत्रांवर योग्य त्या मंचांवर कार्यवाही केली जाईल. यामध्ये पत्नीने पतीविरुद्ध प्रविष्ट (दाखल) केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रलंबित खटल्याचाही समावेश असेल.

हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न