हिंदुत्वनिष्ठांनी निवेदन दिल्यावर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचे संबंधितांवर गुन्हा नोंदवण्याचे आश्वासन

चिपळूण, २ फेब्रुवारी (वार्ता.) – चिपळूण नगर परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या नारायण तलावाच्या परिसरात ३० जानेवारी या दिवशी सायंकाळी मुसलमानांनी नमाजपठण केले. या वेळी तेथे उपस्थित नागरिकांनी त्यांना ‘ही सार्वजनिक जागा असून येथे नमाजपठण करू नये’, असे सांगूनही ते ऐकले नाहीत. या घटनेची नोंद घेऊन २ फेब्रुवारी या दिवशी चिपळूणमधील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन नगराध्यक्ष श्री. उमेश सकपाळ यांना ‘संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी’, असे निवेदन दिले. या वेळी नगराध्यक्ष श्री. उमेश सकपाळ यांनी ‘संपूर्ण माहिती घेऊन हे कृत्य करणार्यांवर नगर परिषदेच्या वतीने गुन्हे नोंदवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार’, असे आश्वासन दिले.
निवेदन देतांना नगरसेवक निहार कोवळे, गोरक्षक विक्रम जोशी, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सर्वश्री मंदार लेले, अजिंक्य ओतारी, अंकुश आवले, गणेश आग्रे, डॉ. हेमंत चाळके, शिल्पा इनामदार, सुप्रिया शिंदे, सारिका भावे आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
१. नारायण तलाव या नगर परिषदेच्या सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कृती करणे, हा गुन्हा असून तेथे नमाजपठाण करण्याची कृती ही जाणीवपूर्वक केली गेली आहे. नमाजपठाण करण्यासाठी आलेले मुसलमान त्यासाठी आवश्यक असलेले साहित्य स्वतःसमवेत घेऊन आले होते. या कृत्यामुळे चिपळूण शहरात धार्मिक तणाव निर्माण करून शहरातील सामाजिक शांतता बिघडवण्याचे हे षड्यंत्र आहे, असे हिंदुत्वनिष्ठ संघटनाच्या वतीने या वेळी सांगण्यात आले.
२. तेथे कुणी नगर परिषदेचा पहारेकरी (वॉचमन) होता का ? त्यांनी त्यांना का रोखले नाही ? हा प्रकार गंभीर असून संबंधित कर्मचार्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
३. झालेल्या प्रकाराबद्दल नगर परिषद प्रशासनही उत्तरदायी असून या संदर्भात नगर परिषद प्रशासनाने तातडीने नमाजपठाण करणार्यांच्या विरोधात पोलीस कारवाईसाठी तक्रार करावी, अन्यथा हिंदुत्वनिष्ठ संघटना आंदोलन करतील आणि त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला नगर परिषद प्रशासन उत्तरदायी राहील, असे प्रत्यक्ष आणि निवेदनाच्या माध्यमातून नगर परिषद प्रशासन अन् लोकप्रतिनिधी यांना या वेळी सांगण्यात आले.
हे ही वाचा → चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथे धर्मांधांकडून चाचपणी आणि हिंदुत्वनिष्ठांची प्रखर चेतावणी ! |
४. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी यासंबंधी चिपळूण पोलीस निरीक्षक मेंगडे यांचीही भेट घेतली आणि ‘या प्रकरणी गुन्हे नोंद करण्यात यावेत’, अशी मागणी केली.
५. या प्रकाराची गंभीरपणे नोंद घेऊन चिपळूण शहरातील धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने नगर परिषदेत उपस्थित राहिले आणि त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.
संपाकीदय भूमिका
|
नवीन घाटांची कामे जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा आदेश
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
Bahraich Talaq : सासर्याने बलात्कार केल्याचे सांगताच पती रेहानकडून पत्नीला तलाक !
राजापूर तालुक्यात पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी करा !