भारताने नोंदवला निषेध
मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – येथील रोव्हविल परिसरातील ‘ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटर’मधून मोहनदास गांधी यांची ४२६ किलो वजनाची कांस्य मूर्ती चोरीस गेली आहे. भरदिवसा ही चोरी करण्यात आली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. दोषींना तातडीने अटक करून मूर्ती परत मिळवावी, अशी मागणी त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या अधिकार्यांकडे केली आहे.
१. ही घटना २ फेब्रुवारीला दुपारी घडली. चेहरा झाकलेले ३ जण पांढर्या रंगाच्या व्हॅनमधून आले होते. त्यांनी विद्युतचालित एंगल ग्राइंडरचा वापर करून मूर्ती चौथर्यापासून तोडली आणि मूर्ती ते घेऊन गेले.
२. १२ नोव्हेंबर २०२१ या दिवशी भारत सरकारकडून ‘भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद’ या संस्थेच्या माध्यमातून ही मूर्ती ऑस्ट्रेलियाला भेट देण्यात आली होती. त्या वेळी ऑस्ट्रेलियाचे तत्कालीन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी ती शांतता आणि अहिंसेचे प्रतीक म्हणून स्वीकारली होती.
संपादकीय भूमिकादिवसाढवळ्या अशा प्रकारची चोरी होणे हे ऑस्ट्रेलियासाठी लज्जास्पदच होय ! कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणारीच ही घटना आहे. अशा देशात सर्वसामान्यांचे रक्षण कसे होत असणार ?, हा प्रश्नच आहे ! |

संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !