
कीव (युक्रेन) – रशियाने युक्रेनवर या वर्षीचे सर्वांत मोठे आक्रमण केले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांच्या मते रशियाने एकाच रात्री लांबपल्ल्याचे सुमारे ४५० ड्रोन आणि ७० हून वेगवेगळे क्षेपणास्त्रे डागली. हे आक्रमण युक्रेनच्या ५ भागांत करण्यात आले. यात वीज केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. यात किमान १० जण घायाळ झाले. विशेष म्हणजे या आक्रमणाच्या वेळी ‘नाटो’चे (‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेल्या एक सैनिकी संघटनेचे) महासचिव मार्क रुट युक्रेनची राजधानी कीव येथे पोचले होते.
नाटो युक्रेनला साहाय्य करत रहाणार ! – नाटोचे सरचिटणीस
नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांनी युक्रेनच्या संसदेत सांगितले की, ‘नाटो देश युक्रेनला साहाय्य करत रहातील.’ गेल्या वर्षापासून नाटो देशांनी युक्रेनला आवश्यक असलेल्या ७५ टक्के क्षेपणास्त्रांचा आणि ९० टक्के हवाई संरक्षण प्रणालींचा पुरवठा केला आहे.
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता
देवस्थान भूमीसंदर्भात शासकीय देवस्थान समितीची पहिली बैठक पार पडली !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !