(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

सीहोर (मध्यप्रदेश) : सीहोर जिल्ह्यातील एका मदरशात कुराणासमवेत श्रीमद्भगवद्गीतेचे पठण चालू करण्याचा सल्ला देण्यात आला होता. या सूचनेला तेथे संमतीही मिळाली; मात्र आता याला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे.
🕌📖 Sehore, Madhya Pradesh | Truth Exposed
✅ A madarsa in Sehore allows recitation of the Shrimad Bhagavad Gita to promote moral values & national harmony.
❌ Yet, Congress objects!
📖 On Republic Day, Sr IPS officer Raja Babu Singh explained the Gita’s values, encouraging… pic.twitter.com/oBT3b4FKBJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 29, 2026
प्रजासत्ताकदिनी भारतीय प्रशासकीय पोलीस सेवेतील अधिकारी राजा बाबू सिंह यांनी ‘इस्लामिया मदीना-तुल-उलूम’ या संस्थेतील विद्यार्थ्यांना गीतेतील कर्मयोग आणि नैतिक मूल्य यांचे महत्त्व समजावून सांगितले. या शिकवणीतून सकारात्मक विचारसरणी आणि उत्तरदायी नागरिकत्वाची जाणीव निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.

मदरसा संचालकाची गीता शिकवण्याला संमती
पोलीस अधिकार्यांच्या सूचनेवर मदरशाचे संचालक अमीन उल्लाह यांनी सांगितले की, ज्या ग्रंथातून समाज आणि देशाच्या प्रगतीस हातभार लागतो आणि सकारात्मक संदेश मिळतो, तो वाचण्यात कोणतीही अडचण नाही. त्यांनी आधी स्वतः गीता वाचण्याची आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना तिची शिकवण देण्याची सिद्धता दर्शवली. राजा बाबू सिंह यांच्या सूचनेला भाजपचे स्थानिक आमदार रामेश्वर शर्मा यांनी पाठिंबा दिला. मदरशात हिंदू विद्यार्थीही शिक्षण घेतात आणि ते कुराण वाचू शकतात, तर सर्व विद्यार्थी गीता का वाचू शकत नाहीत ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
(म्हणे) ‘मदरशांच्या मौलानांना ज्ञान देण्याची आवश्यकता नाही ! – काँग्रेसचे नेते अब्बास हफीज
यावर काँग्रेसचे नेते अब्बास हफीज यांनी आक्षेप घेत म्हटले की, मदरशात शिक्षण देण्याचे काम मौलाना नीट पार पाडत आहेत, त्यांना ज्ञान देण्याची आवश्यकता नाही. पोलीस अधिकार्यांनी कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे; परिसरात लूटमार अन् गुन्हे वाढले आहेत, ते अल्प करण्याचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले. (देशातील गुन्हेगारी आणि लूटमार वाढण्यात गुन्हेगारी वृत्तीच्या काही मुसलमानांचाही समावेश आहे. जिहादी आतंकवादी मदरशांतूनच निर्माण होतात, असे चित्र आहे. अशा मदरशांमध्ये गीतेची शिकवण दिली गेली, तर त्याच परिणाम होऊन देशातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली होण्यास साहाय्यच होईल ! – संपादक)
संपादकीय भूमिकाभारताची फाळणी होण्यामागेही काँग्रेस आहे आणि आज देशात दुसर्या फाळणीसारखी स्थिती काँग्रेसमुळेच निर्माण झाली आहे. त्यामुळे भारताच्या हितासाठी काँग्रेसमुक्त भारत होणे किती आवश्यक आहे ?, हे यावरून लक्षात येते ! |
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court