Republic Day : देशभरात उत्साहात साजरा झाला ७७ वा प्रजासत्ताकदिन !

देहलीतील कर्तव्य पथावर झाले संचलन

नवी देहली : देशभरात भारताचा ७७ वा प्रजासत्ताकदिन उत्साहास साजरा करण्यात आला. प्रतिवर्षीप्रमाणे देहलीच्या कर्तव्य पथावर (पूर्वीचे राजपथ) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि नंतर तेथे भारताच्या तिन्ही दलांकडून संचलन करण्यात आले.

तसेच विविध शस्त्रांचे प्रदर्शनही करण्यात आले. यावर्षी संचालनाचा विषय ‘स्वातंत्र्याचा मंत्र – वन्दे मातरम्’ हा होता.

कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी भारताने युरोपियन युनियनचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांना आमंत्रित केले होते. ते दोघेही या वेळी उपस्थित होते.

देशातील राज्यांकडून त्यांचे चित्ररथ सादर करण्यात आले. यात महाराष्ट्राने सादर केलेल्या चित्ररथामध्ये गणेशोत्सवाचा देखावा करण्यात आला होता.