ट्रम्प यांच्या आयात शुल्क लादण्याच्या धमकीचा परिणाम

ओटावा (कॅनडा) – कॅनडाने चीनसमवेत नुकत्याच केलेल्या व्यापार करारामुळे संतप्त झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला १०० टक्के आयात शुल्क लादण्याची धमकी दिल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी कॅनडातील नागरिकांना स्वदेशी वापरण्याचे आवाहन एका व्हिडिओद्वारे केले. मार्क कार्नी यांनी म्हटले आहे की, आपल्या अर्थव्यवस्थेला सध्या बाह्य धोका आहे. त्यामुळे जे आपल्या नियंत्रणात आहे, त्यावरच आपल्याला लक्ष केंद्रित करावे लागेल.
Canadian PM Mark Carney issues a powerful call to 'Buy Canadian'! 🇨🇦
🔹 This move comes as a direct counter to Donald Trump’s threats of heavy import duties on Canada.
🔹 It is time for nations to resist arbitrary economic pressure and safeguard their own industries.
The… pic.twitter.com/wqqmD4RiLC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 26, 2026
‘चीन कॅनडाला एका वर्षाच्या आत गिळून टाकेल’, अशी चेतावणीही ट्रम्प यांनी दिली होती. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी हे डॉनल्ड ट्रम्प यांच्या ‘गोल्डन डोम’ क्षेपणास्त्र प्रकल्पाला विरोध करत असल्यानेही ट्रम्प यांनी वाढीव आयात शुल्क लादण्याची धमकी दिल्याचे सांगितले जात आहे.
अमेरिकेला मिळणारे कच्चे तेल, वायू आणि विजेचा मोठा पुरवठा कॅनडामधून होतो. यासह गाड्यांचे सुटे भाग, लाकूड आणि कृषी उत्पादनेही कॅनडातून मोठ्या प्रमाणात अमेरिकेत जातात.
संपादकीय भूमिकाट्रम्प यांच्या मनमानीपणामुळे सर्वच देशांनी अमेरिकेला अशा प्रकारे धडा शिकवणे आवश्यक आहे ! |
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !