माजी पंतप्रधान शेख हसीना

नवी देहली : भारतात निर्वासित जीवन जगत असलेल्या बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशातील अंतरिम सरकारवर कठोर टीका केली आहे. बांगलादेशात होऊ घातलेल्या निवडणुकीपूर्वी त्यांनी तेथील जनतेला युनूस सरकारच्या विरोधात उभे रहाण्याचे आवाहन केले. बांगलादेशात युनूस सरकार स्थापन झाल्यापासून अल्पसंख्यांकांवर अन्याय होत आहे, विशेषतः महिला आणि मुली यांना छळले जात आहे, असे शेख हसीना यांनी म्हटले आहे.
Persecution of Minorities | Bangladesh in Crisis 🇧🇩🔥
Former PM Sheikh Hasina says Bangladesh is facing its “darkest hour” – a blood-soaked landscape where democracy is in exile 🩸⚖️
• Slams the Muhammad Yunus–led interim government for chaos, violence & breakdown of law and… pic.twitter.com/4RkUSbkait
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 24, 2026
१. बांगलादेशात १२ फेब्रुवारी या दिवशी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अवामी लीगला निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात आले आहे. अवामी लीगच्या प्रमुखांनी ऑडिओ संदेशाच्या माध्यमातून बांगलादेशातील प्रत्यक्ष परिस्थिती मांडली आणि युनूस सरकारच्या विरोधात जनतेला जागृत होण्याचे आवाहन केले. ५ ऑगस्ट २०२४ या दिवशी सत्तेवरून बलपूर्वक हटवल्यानंतर शेख हसीना भारतात वास्तव्यास आहेत.
२. या कठीण काळात संपूर्ण बांगलादेशाने एकत्र येऊन मुक्तिसंग्रामाच्या भावनेतून पुढे जाण्याचे आवाहन शेख हसीना यांनी केले आहे.
| Exiled Bangladesh PM Sheikh Hasina delivers speech via audio at “Save Democracy in Bangladesh” event in New Delhi. Hasina calls Muhammad Yunus “Murderous Fascist”. She accused Yunus of running an “illegal, violent” regime and plunging the country into age of terror, lawlessness.
|
३. शेख हसीना पुढे म्हणाल्या की, बांगलादेशात मानवाधिकार पायदळी तुडवले गेले आहेत. प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य संपुष्टात आले आहे. हिंसा, छळ आणि महिलांवरील लैंगिक अत्याचार चालूच आहेत. धार्मिक अल्पसंख्यांकांवर सातत्याने अन्याय होत असून कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
४. शेख हसीना यांनी अलीकडील घटनांची आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून निष्पक्ष चौकशी होण्याची आवश्यकता व्यक्त केली. सध्याच्या सरकारला त्यांनी ‘परकीय हस्तक’ ठरवत ‘राष्ट्राचे शत्रू’ असे संबोधले आहे.
Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !